घरताज्या घडामोडीसुशांतने फ्लॅट घेऊन दिला? आरोप करणाऱ्यांना अंकिताचे सडेतोड उत्तर

सुशांतने फ्लॅट घेऊन दिला? आरोप करणाऱ्यांना अंकिताचे सडेतोड उत्तर

Subscribe

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता. या आरोपांचे अंकिताने केले खंडन आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी अनेक दिवसांपासून एक चर्चा सुरु होती की, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता. या आरोपांचे अंकिताने खंडन केले आहे. तिने याबाबत स्पष्टीकरण देत आरसा दाखवला आहे.

अंकिताने दिले सडेतोड उत्तर

अभिनेत्री अंकिता लोखंडेने आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. अंकिताने सोशल मीडियावर बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोस्ट केली आहेत. त्यावरुन फ्लॅटचा हप्ता सुशांत नाही तर अंकिता स्वत: भरत असल्याचे दिसत आहे. तसेच घर घेताना बँकेच्या कागदपत्रावर अंकिता लोखंडे हिच्या खात्याची माहिती आहे. अंकिताने सर्व कागदपत्रे पोस्ट करत आरोप करणाऱ्यांचं तोंड बंद केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाली अंकिता?

अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या फ्लॅटचे रजिस्ट्री कागदपत्र पोस्ट करताना लिहलेय की, ‘माझ्यावर होत असलेल्या आरोपाचं मी खंडन करतेय. यापेक्षा आधिक ट्रांसपेरेंट होऊ शकत नाही. माझ्या फ्लॅटचे रजिस्टर कागदपत्रे आणि बँक डिटेल्स. यामध्ये तुम्ही पाहू शकता. एक जानेवारी २०१९ ते एक मार्च २०२० पर्यंत माझ्या खात्यातून पैसे कट झाले आहेत.’ अंकिताच्या या पोस्टवर सुशांत राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने कमेंट केली आहे. श्वेता सिंह म्हणते, ‘तू स्वतंत्र मुलगी असल्याचे मला माहित आहे. याचा गर्व आहे.’ अंकिता लोखंडेने ही कागदपत्रे पोस्ट केल्यानंतर काही चात्यांनी तिच्या सपोर्टमध्ये मत व्यक्त केले आहे. तू आत्मनिर्भर असल्याचे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, असे एका चाहत्याने ट्विट करत अंकिताला दिलासा दिला आहे.

View this post on Instagram

In continuation 🙏🏻

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

- Advertisement -

अंकिता लोखंडे सध्या सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी यासाठी सोशल मीडियावर जोरदार आवाज उठवत आहे. अलिकडेच तिने “सुशांतसोबत नेमकं काय घडलं? हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतची केस CBI कडे सोपवावी. #CBI for SSR” अशा आशयाचे ट्विट देखील केले होते.

ईडीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने अंकितासाठी मालाडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत तब्बल ४ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. या फ्लॅटचे ईएमआय सुशांत भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहतेय. रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट रिकामा करायचा होता. परंतु, अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती.


हेही वाचा – आधी गणपती विसर्जन, मगच पोलिसांच्या बदल्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -