Corona Update: ठाण्यात दिवसभरात १ हजार ९२१ नव्या रुग्णांची नोंद, ३१ मृत्यू

Corona Update: ठाण्यात दिवसभरात १ हजार ९२१ नव्या रुग्णांची नोंद, ३१ मृत्यू

ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात गुरुवारी जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात दिवसभरात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार ९२१ तर, ३१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३६ हजार ५६७ तर, मृतांची संख्या १ हजार १३० झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.

गुरुवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक ५६० रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ७ हजार ४८५ तर, मृतांची संख्या १२७ इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत ३९५ बाधितांची तर, ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या ९ हजार ५३० तर, मृतांची संख्या ३५२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत २६५ रुग्णांची तर, सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ७ हजार ८८ तर, मृतांची संख्या २२४ वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ८८ बधीतांसह २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या २ हजार १११ तर, मृतांची संख्या ११४ वर पोहोचली. त्यात मीरा भाईंदरमध्ये १७१ रुग्णांची तर, चार नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ३ हजार ६०९ तर, मृतांची संख्या १४९ इतकी झाली आहे. उल्हासनगर १७४ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २ हजार १५६ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६३ रुग्णांची तर, एका मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १ हजार ९३१ तर, मृतांची संख्या ५२ झाली आहे. बदलापूरमध्ये ५१ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ८५८ झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात १५४ रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १ हजार ७९९ तर, मृतांची संख्या ५० वर गेली आहे.

ठाणे शहरांत गुरुवारी कोरोना रुग्णांचा गुणाकार; ३९५ नवे रुग्ण

ठाण्यात कोरोनाच्या बेरीज-वजाबाकी आणि गुणकाराचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत असलेला कोरोना रुग्णांचा उच्चांक ३६५ हा गुरुवारी मोडीत काढीत ठाण्यात तब्बल ३९५ नव्या रुग्णांचा भरणा झाल्याने पालिका प्रशासन हवालदिल झाले आहे. ठाण्यात कोरोना रुग्णांची बेरीज तर कधी वजाबाकी तर गुणाकार करीत आज गुरुवारी सर्वाधिक कोरोना रुग्ण आतापर्यंतच्या आकडेवारीत सापडले आहेत. जवळपास ४०० च्या आसपास म्हणजेच ३९५ एवढे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. रविवारी ठाण्यात ३४१ रुग्ण, सोमवारी ३३८ रुग्ण, मंगळवारी २६६ रुग्ण तर बुधवारी ३६३ रुग्ण आढळले तर आज गुरुवारी ३९५ रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांची बेरीज आणि गुणाकार झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यात सध्याच्या स्थितीत ४८८१ रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. तर प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४३१६ एवढी आहे. तर घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ५३ टक्के आहे. तर गुरुवारी मृतकांच्या आकड्यात घट झालेली आहे. गुरुवारी ११ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत पावलेल्या रुग्णांचा आकडा ३३३ वर गेला आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात आतापर्यंत १ लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात!


प्रभाग निहाय रुग्णांची आकडेवारी

ठाण्यात बुधवारी कोरोनाचे ३६३ नवे रुग्ण आढळले होते यात प्रभाग स्तरावर त्यांची आकडेवारी अशा प्रकारे… माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत ४४, वर्तकनगर प्रभाग समितीत ३३, लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत ३८, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत ९०, उठलसार प्रभाग समितीत ४४, वागळे प्रभाग समितीत २५, कळवा प्रभाग समितीत ४८, मुंब्रा प्रभाग समितीत १९ आणि दिवा प्रभाग समितीत २० तसेच इतर रुग्णांची संख्या २ एवढी होती. यात नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अव्वल नंबरवर आहे. तर आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण प्रभाग समितीत सापडण्याची हा विक्रमच म्हणावा लागेल. दुसऱ्या क्रमांकावर कळवा प्रभाग समिती आहे.

First Published on: July 2, 2020 9:48 PM
Exit mobile version