धक्कादायक! पनवेल वृद्धाश्रमात एकाचवेळी ५८ जण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

धक्कादायक! पनवेल वृद्धाश्रमात एकाचवेळी ५८ जण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

धक्कादायक! पनवेल वृद्धाश्रमात एकाचवेळी ५८ जण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असून आरोग्य व्यवस्थेचे भयावह चित्र समोर येत आहे. दररोज वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण पाहता चिंताजनक घटना समोर येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गा आटोक्यात आणताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच पनवेल तालुक्यातील एका वृद्धाश्रमातून चिंताजनक घटना समोर आली आहे. मुंबईपासून जवळच असणाऱ्या पनवेलमधील शांतीधाम वृद्धाश्रमात एकाच वेळी तब्बल ५८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वृद्धाश्रमातील दोघांची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या वृद्धाश्रमात एवढ्या मोठ्याप्रमाणात कोरोनाची लागण कशी झाली आणि योग्यती खबरदारी घेतली गेली नाही का? असा सवाल उपस्थित गेले जात आहे.

याबाबत पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेलमधील शांतीधाम वृद्धाश्रमात ५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील १६ जणांची प्रकृती अस्थिर असून ऑक्सिजनची गरज भासल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वृद्धाश्रमात आयसोलेट करण्यात आलेल्या इतर व्यक्तींची तपासणी केली जात आहे.

राजगड जिल्हातील पनवेल तालुक्य़ात सर्वाधिक कोरोना असून दररोज याठिकाणी ४०० ते ५०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. या परिस्थितीत वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी कोरोनाबाबत असा हलगर्जीपण होणे धक्कादायक असल्याचे मत अनेक जण व्यक्त करत आहेत.


हेही वाचा- हाहाकार! देशात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या नजीक तर २ हजाराहून अधिक मृत्यू


 

First Published on: April 21, 2021 11:55 AM
Exit mobile version