घरदेश-विदेशहाहाकार! देशात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या नजीक तर २...

हाहाकार! देशात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या नजीक तर २ हजाराहून अधिक मृत्यू

Subscribe

देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून परिस्थिती अधिक चिंताजनक बनत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहयला मिळत असून मृतांची संख्याही दिवसगणिक वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा १ लाख ८२ हजार ५५३ वर पोहचला आहे. तर गेल्या २४ तासात देशात २ लाख ९५ हजार ०४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ६७ हजार कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात आत्तापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ रुग्ण उपचारानंतर कोरोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. आत्ताच्या घडीला देशात २१ लाख ५७ हजार ५३७ अॅटिव्ह रुग्ण आहेत. तर १३ कोटी १ लाख १९ हजार ३१० देशवासियांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -