देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला, गेल्या २४ तासांत देशात १५ हजार नवे बाधित

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला,  गेल्या २४ तासांत देशात १५ हजार नवे बाधित

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा (Corona Patient) संसर्ग वाढत असून गेल्या २४ तासांत दशात १५ हजार ७५४ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. बुधवारी १२ हजार ६०८ रुग्ण सापडले होते. त्यामुळे एका दिवसात तीन हजार नव्या रुग्णांची वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. तर, सध्या १ लाख १ हजार ८३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्रात आढळला जीवघेणा स्क्रब टायफस आजार, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे ३१ लाख ५२ हजार ८८२ डोस देण्यात आले आहेत. तर, दैनंदिन पॉझिटीव्हिटी रेट ३.४७ टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.५८ टक्के आहे.

देशभरातील नव्या रुग्णसंख्येत महाराष्ट्रातील २२४६ रुग्ण आहेत. तर गुरूवारी दिवसभरात एकूण १९२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, काल सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर हा १.८३ टक्के इतका झाला. तसेच, आतापर्यंत राज्यामध्ये ७९, १८, ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

First Published on: August 19, 2022 11:28 AM
Exit mobile version