Corona Update : राज्यात कोरोनाचे 130 नवे रुग्ण, तर 102 रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत 49 नवे रुग्ण

Corona Update : राज्यात कोरोनाचे 130 नवे रुग्ण, तर 102 रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत 49 नवे रुग्ण

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचे 121 नवे रुग्ण, मुंबईतील 68 रुग्णांची नोंद

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे राज्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे दिसतेय.
दरम्यान गेल्या 24 तासात राज्यात 130 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 102 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 937 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

आज झालेल्या 2 रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत 77,25, 553 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झालेय. राज्यात आजपर्यंत 7, 94, 53, 522 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे.

यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 290 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 145 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतेय. मुंबईत गेल्या 24 तासात 49 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आजही एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, आज मुंबईत 33 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज निदान झालेल्या 49 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्ण ऑक्सिज बेडवर उपचार घेत आहे. तर एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत असून रुग्ण दुपटीचा दर 15952 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण बाधितांपैकी आतापर्यंत एकूण 1038227 रुग्ण बरे झाले आहेत. या बरोबरच मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आहे 98 टक्के झाला आहे. मुंबईत बरे झालेले एकूण संख्या 1038227 इतके आहे. तसेच मुंबईत आज एकूण 290 रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत 26 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत रुग्णवाढ 0.04 टक्के इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.


देशामध्ये धर्माच्या नावावर नागरिकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा आरोप

First Published on: April 2, 2022 8:59 PM
Exit mobile version