कोरोना संकट वाढले; पुण्यात सात दिवसांचे लॉकडाऊन

कोरोना संकट वाढले; पुण्यात सात दिवसांचे लॉकडाऊन

राज्यात विशेषत: पुण्यात कोरोनाच्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या शहरात आजपासून सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या या संकटात प्रथमच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील बदलत्या परिस्थितीचा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. आढावा घेतल्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांपुढे लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन काळात शहरातील बससेवा, धार्मिक स्थळे, हॉटेल सेवा बंद राहील.

शहरातील परिस्थिती कोरोनामुळे बिकट होत चालली असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. पुण्यातील कोरोना बाधितांची टक्केवारी ३२ टक्क्यांहून अधिक असल्याचे ते म्हणाले. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रुग्ण असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल केले जातील, असे राव म्हणाले. रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने हॉस्पिटल्समधील खाटांची संख्या वाढवली जात आहे.

शहरातील हॉस्पिटल्समधील टेस्टिंगचे प्रमाणही वाढवले जाईल, असे राव म्हणाले. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. गेल्या दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्येही रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने तो एक चिंतेचा विषय बनला आहे.

पुण्यात काय सुरू, काय बंद?
शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमागृहे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक बससेवा, आठवडे बाजार, शाळा महाविद्यालये, सामाजिक, राजकीय कार्यक्रम

सुरू राहणार
पार्सलसेवा, जीम, १० वी, १२ वीच्या परीक्षा

*मृत्यूदर वाढतोय
*बेड्सची संख्या अपुरी
*पुढील आठवडा संकटाचा
*संकटात बाहेर पडू नका

पुण्यातील बेड स्थिती
* ऑक्सिजन बेड्स – 9118
*ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093
*आयसीयु बेड्स – 2927
*व्हेंटिलेटर्स बेड – 996

उपलब्ध बेड्स
*ऑक्सिजन बेड्स – 6144
*ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530
*आयसीयु बेड्स – 1854
*व्हेंटिलेटर्स बेड्स – 620

रुग्ण संख्या
*अ‍ॅक्टिव्ह रुग्ण – 61740
*उपचारार्थ दाखल रुग्ण – 15986 (गंभीर रुग्ण 4423 )
*होम क्वारन्टाईन रुग्ण – 45754

जिल्ह्याचा मृत्यूदर
*पुणे मनपा – 2 टक्के
*पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के
*पुणे देहू व खडकी कन्टेन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के
*पुणे ग्रामीण – 1.9 टक्के
*पुणे जिल्हा एकूण मृत्यूदर – 1.8

First Published on: April 3, 2021 4:00 AM
Exit mobile version