१५ जुलैपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस मोफत

१५ जुलैपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस मोफत

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण (Corona vaccination) हा जलीम उपाय मानला जात आहे. राज्यभरात लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात असून देशाच्या अनेक भागांत लसीकरण मोहीम राबवल्या जात आहे. अशातच देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस (Free Booster Dose) देण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona Vaccination free booster doses will be given to citizens above 18 years of age from July 15)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या बुस्टर डोससंबंधीचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. त्यानुसार, येत्या १५ जुलैपासून ७५ दिवस कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस (Free Booster Dose) दिला जाणार आहे. ज्यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी बूस्टर डोस मोफत देण्याची व्यवस्था केंद्र सरकारतर्फे केली जाणार आहे.

“मार्च २०२२ पासून कोरोना महामारी हा देशासमोरचा मोठा चिंतेचा विषय आहे. भारताने आतापर्यंत १९९ कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीकरण केले आहे. हा आकडा जवळपास १९९ कोटी ६० हजार आतापर्यंत लसीकरण झाले आहे. आता १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवसांपर्यंत १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. याआधी बूस्टर डोससाठी नागरिकांकडून शुल्क घेतले जात होते”, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले.

“याआधी फ्रंटलाइन वर्कर्स, कोव्हिड वॉरिअर्स होते किंवा ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी हा बुस्टर डोस मोफत दिला जात होता. मात्र आता १८ वर्षांवरील सर्वांना हा डोस मोफत दिला जाणार आहे. सर्व सरकारी केंद्रांवर हा डोस उपलब्ध असेल”, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले.


हेही वाचा – खवळलेल्या समुद्राने गिळलं कुटुंब! सांगलीतील एकाच कुटुंबातील पित्यासह दोन मुलं ओमनच्या समुद्रात गेली वाहून

First Published on: July 13, 2022 4:46 PM
Exit mobile version