करोना व्हायरस : वुहानमधील पाच जण महाराष्ट्रात परतले

करोना व्हायरस : वुहानमधील पाच जण महाराष्ट्रात परतले

करोना व्हायरस

चीनमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण पसरलं असून वुहानमध्ये अडकलेल्या प्रवाशांपैकी गुरुवारी ५ जण महाराष्ट्रात परतले असल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. इथे अडकलेल्या लोकांना आर्मी कॅम्पमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील बुधवारी ३६ प्रवासी परतले असताना गुरुवारी पुन्हा पाच प्रवासी राज्यात परतले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

परतणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या ४१

आतापर्यंत वुहानमधून महाराष्ट्रात परतलेल्या प्रवाशांची एकूण संख्या ४१ झाली आहे. या सर्व प्रवाशांचा १४ दिवसापर्यंत आरोग्यविषयक पाठपुरावा करण्यात येणार आहे. तर, आजपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४३ हजार ३१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.

बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून २७४ प्रवासी आले आहेत. पैकी १६३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७४ जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी ७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. आजवर भरती झालेल्या ७४ प्रवाशांपैकी ७० जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी २ जण मुंबई आणि पुणे येथे उपचार घेत आहेत.


हेही वाचा – ७० वर्षीय पुरुषाच्या पित्ताशय नलिकेत जंत!


First Published on: February 21, 2020 10:21 AM
Exit mobile version