Coronavirus: लग्नासाठी जमला जमाव; पोलिसांनी वधू-वराच्या कुटुंबाला केली अटक

Coronavirus: लग्नासाठी जमला जमाव; पोलिसांनी वधू-वराच्या कुटुंबाला केली अटक

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, माजलगाव येथे हा आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच वधू-वराच्या कुटुंबासह लग्न लावणाऱ्या भटजी आणि फोटोग्राफरला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना बीड जिल्ह्यातील ब्रम्हगाव येथे घडली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, हा निर्देशाचे पालन न करता माजलगावपासून १ किमी अंतरावर असलेल्या ब्रम्हगाव येथे गुरुवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान लग्नासाटी जमाव जमला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना कळाली. त्यानंतर पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी शहर पोलिसांना लग्नाच्या ठिकाणी जाण्यस सांगितले. त्यानंतर पोलिस निरीक्षक अविनाश राठोड यांनी पोलिस ताफा घेऊन लग्नाचे ठिकाण गाठले. लग्नाच्या ठिकाणी १०० हून अधिक लोक जमा झाले होते. पोलिसांनी करोनाबाबत खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची उद्घोषणा करत लोकांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, या आदेशाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लग्न लावणारे भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना अटक केली.


हेही वाचा – करोनाशी लढा, पंतप्रधानांची नवी घोषणा! वाचा त्यांच्या संदेशातील प्रत्येक मुद्दा!


करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रोज्य सरकाने काही निर्देश दिले आहेत. अनावश्यक गर्दी टाळा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यासह शाळा, कॉलेजसना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचे ४८ रुग्ण आहेत.

 

First Published on: March 19, 2020 9:19 PM
Exit mobile version