करोना विषाणू हा केमिकल हल्ला

करोना विषाणू हा केमिकल हल्ला

करोना विषाणू हा केमिकल हल्ला असल्याचा दावा करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडवली आहे. करोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सध्या केमिकल हल्ले, बायोलॉजिकल हल्ले होत आहेत. त्यातच कोरोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आले आहे. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या हल्ले करण्यात येत आहेत. 2018 मध्ये ड्रोनच्या माध्यमातून व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांवर हल्ला करण्यात आला होता, असे देशमुख यांनी ठामपणे सांगितले.

सध्या जगापुढे मोठे संकट बनून उभा असलेला करोना विषाणू हा एक प्रकारचा केमिकल हल्ला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केल्यामुळे सध्या राज्यभरात चर्चा होऊ लागली आहे. पुण्यात साहित्य कलाप्रसारणी सभेच्यावतीने मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुखांनी हा दावा केला. एका राज्याच्या गृहमंत्री असा दावा करत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

सध्या जगापुढे मोठे संकट बनून उभा असलेला करोना विषाणू हा एक प्रकारचा केमिकल हल्ला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केल्यामुळे सध्या राज्यभरात चर्चा होऊ लागली आहे.पुण्यात साहित्य कलाप्रसारणी सभेच्यावतीने मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुखांनी हा दावा केला. एका राज्याच्या गृहमंत्री असा दावा करत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. करोनाचा उगम हा चीनमध्ये झाला आहे. आजपर्यंत करोना विषाणूने चीनमध्ये सुमारे १६०० बळी घेतले आहेत. तसेच जगभरातही करोना विषाणूंच्या बळींची संख्या वाढत आहे.

First Published on: February 17, 2020 5:45 AM
Exit mobile version