CoronaVirus: राज्यात कोरोनाचा आठवा बळी, बुलढाण्यात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

CoronaVirus: राज्यात कोरोनाचा आठवा बळी, बुलढाण्यात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

राज्यात कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दिवसेंदिवसे कोरोनाचे रुग्ण वाढ असताना आता मृतांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे बुलाढाण्यातील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. हा रुग्ण आधी खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यानच या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १९६ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबई १४, पुणे १५, नागपूर १, औरंगाबाद १, यवतमाळ ३ असं ३४ कोरोना रुग्ण हे बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबई आणि ठाणे परिसर १०७, पुणे ३७,नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १,औरंगाबाद १,यवतमाळ ३, मिरज २५,सातारा २,सिंधुदुर्ग १,कोल्हापूर १,जळगाव १,बुलढाणा १ असा तपशील आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा संख्या १ हजारहून अधिक झाली आहे. त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाल्याच समोर येत आहे. तसंच ८६ जण हे रिकव्हर झाले आहे.


हेही वाचा – स्वत:ला वाचवाल तर देश वाचेल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पत्राद्वारे आवाहन


 

First Published on: March 29, 2020 4:30 PM
Exit mobile version