Corona: कोल्हापुरात ‘या’ आगळ्या-वेगळ्या मास्कला ग्राहकांकडून मागणी!

Corona: कोल्हापुरात ‘या’ आगळ्या-वेगळ्या मास्कला ग्राहकांकडून मागणी!

एक मास्क फक्त ४० टक्के सुरक्षित, 'डबल' मास्किंगचा तज्ज्ञांचा सल्ला

सध्या कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता चेहऱ्यावर मास्क लावणं हे जीवनावश्यक बाब बनली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क आणि पीपीई किट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सध्या कोल्हापुरात आगळ्या-वेगळ्या मास्कची चर्चा सुरू आहे. हा मास्क साध्या कपड्याचा नाही तर चक्क चांदीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापुरातील सोन्या-चांदीचे व्यापारी संदीप सांगावकर यांनी चांदीचा मास्क तयार केला आहे. या मास्कला नियोजित वधू-वरांच्या परिवाराकडून मागणी मिळत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोनाने प्रत्येक नागरिकाला तोंडावर मास्क लावणं भाग पाडले आहे. दरम्यान कोरोना महामारी दरम्यान एन-९५ सह इतर कापड्याच्या मास्कला मागणी असताना कोल्हापुरातील गुजरी भागातील सराफ व्यापाऱ्याने अनोखी शक्कल लढवत चक्क चांदीचे मास्क तयार केले आहे. या अनोख्या मास्कला तयार करण्यासाठी साधारण ८ दिवस लागले असून या मास्कसाठी ५० ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या चांदीच्या एका मास्कची किंमत साधारण अडीच हजार रूपये आहे.

लॉकडाऊन असल्याने दीड महिने घरी बसून असल्याने काही तरी वेगळा दागिना तयार करण्याचा विचार सुरू होता. लग्न सोहळ्यात परिधान करता येईल तसेच कोरोनाशी संबंधित वस्तू तयार करावी, असे विचार सुरू असताना या आगळ्या-वेगळ्या मास्कची कल्पना सुचली असल्याचे या सराफ व्यापाऱ्याने सांगितले.


Viral Photo: त्याने कुत्र्याचं पिल्लू समजून आणलं घरी, पण…
First Published on: May 15, 2020 8:29 PM
Exit mobile version