CoronaVirus: पोलिसांच्या संरक्षणासाठी ‘मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन’ सज्ज!

CoronaVirus: पोलिसांच्या संरक्षणासाठी ‘मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन’ सज्ज!

देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाण्यात रात्रं-दिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, याकरता बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी ‘मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन’ सज्ज झाली आहे.

या सुविधेत कमीत कमी ५ सेकंद उभे राहिल्यास शरिराचे निर्जंतुकीकरण केले जाते. बंदोबस्तातील पोलिसांच्या सुरक्षेसाठी अशाप्रकारची सुविधा प्रथमच महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ पोलिसांना बुधवार म्हणजेच आजपासून घेता येणार आहे.

अशी आहे ‘मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन’

बुलडाणा पोलीस मोटार परिवहन विभागात असणाऱ्या ‘फोर्स मोटर्स लाईट व्हॅन’चा वापर या सुविधेसाठी करण्यात आला असून यामध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. या वाहनावर साधारण ७०० लिटर क्षमतेच्या टाकीचा वापर करण्यात आला आहे. या टाकीमध्ये निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारे सोडिअम हायपोक्लोराईड सोल्युशन पाण्यात एकत्र करून पाईपद्वारे गाडीच्या आतल्या भागात सोडण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील बंदोबस्त असणाऱ्या ठिकाणी जाऊन ही व्हॅन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरणासाठी फिरवण्यात येणार आहे.


‘निवृत्त नर्सेस, वॉर्डबॉय, सैन्यातील मेडिकल स्टाफने कोरोना विरोधातील युद्धात सामील व्हावे’
First Published on: April 8, 2020 4:27 PM
Exit mobile version