Coronavirus Live Update: आकडा वाढतोय, भारतात या घडीला ६४७ रुग्ण

Coronavirus Live Update: आकडा वाढतोय, भारतात या घडीला ६४७ रुग्ण
भारतात करोना बाधित रुग्णांचा आकडा आता वाढीस लागला असून रात्री ११ वाजेपर्यंत एकूण ६४७ रुग्णांची नोंद झाली होती. तर यापैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्र आणि केरळ राज्यात तर रुग्णांच्या आकेडवारीने शंभरी पार केलेली आहे. महाराष्ट्रात दोन मृत्यू झाले आहेत. देशातील एकूण संख्या पाहण्यासाठी तुम्ही https://www.covid19india.org या डॅशबोर्डवर जाऊ शकता.
  कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
  देशभरात दिवसेंदिवस करोना व्हायरस झपट्याने पसरत आहे. आतापर्यंत देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ५००हून अधिका झाली आहे. सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात करोनाचे १०७ रुग्ण आढळले. त्यातील १५ जण करोनामुक्त झाल्याचे देखील समोर आलं आहे.    
Priyanka Shinde

आतापर्यंतची राज्यातील करोनाग्रस्तांची आकडेवारी

मुंबई शहर आणि उपनगर – ४५
पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे मनपा – १९
नवी मुंबई – ५
कल्याण – ५
नागपूर – ४
यवतमाळ – ४
सांगली – ९
अहमदनगर – ३
ठाणे – ३
सातारा – २
पनवेल- १
उल्हासनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
वसई-विरार – १

मुंबईत आणखी चार नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील करोना आकडा ११६वर पोहोचला आहे.

Priyanka Shinde

गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून लोकांशी संवाद साधला. यावेळी, ‘काहीही झालं, तरी किराणा, भाजीपाला, अन्नधान्य, डॉक्टर्स, नर्सेस, पशुखाद्य, पशुवैद्यक अशा जीवनावश्यक बाबी बंद होणार नाही. त्यामुळे घाबरून गर्दी करू नका’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Priyanka Shinde

राज्यातील पहिल्या करोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा –

CoronaVirus: राज्यातील पहिल्या करोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज!
Priyanka Shinde

सांगलीतील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे.

First Published on: March 25, 2020 10:57 PM
Exit mobile version