कोरोनाचा धोका वाढला; चीनसह ‘या’ 5 देशांमधून येणाऱ्यांसाठी RT-PCR चाचणी बंधनकारक

कोरोनाचा धोका वाढला; चीनसह ‘या’ 5 देशांमधून येणाऱ्यांसाठी RT-PCR चाचणी बंधनकारक

चीन, अमेरिकासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. दिवसागणिक वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आता RT PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी सांगितले. या देशांतील कोणत्याही प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास लोकांना क्वारंटाइन केले जाईल.

भारतात कोरोनाचे आज 201 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासह आत्तापर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार पोहचली आहे. देशात सध्या 3,397 कोरोनाच्या अॅटिव्ह केसेस आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार, भारतात आत्तापर्यंत 5 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान देशातील 75 टक्के लोकांना बूस्टर डोस मिळालेला नाही. आत्तापर्यंत कोणत्याही राज्यात बूस्टर डोसचे कव्हरेज 50 टक्क्यांपर्यंत पोहचलेलं नाही. तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे. यात आजपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम चाचणी विमानतळावर सुरु होणार आहे. दरम्यान लष्करानेही आता एक ऍडव्हायजरी जारी करून जवानांना मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग यांसारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.


रामसेतूच्या अस्तित्वाबाबत कोणताही अधिकृत पुरावा नाही; केंद्राने संसदेत दिली माहिती


First Published on: December 24, 2022 2:14 PM
Exit mobile version