धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; मुलांसह पत्नीनेही संपवले आयुष्य

धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; मुलांसह पत्नीनेही संपवले आयुष्य

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने दोन जुळ्या मुलांसह पत्नीने देखील आपले आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. पतीच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने या माय-लेकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळाली आहे.

नेमके काय घडले?

कोरोना विषाणूमुळे आपल्या पतीचा मृत्यू झाला आणि आपला आधार असलेला पती या जगात नाही, या धक्क्याने महिलेने दोन जुळ्या मुलांसह आत्महत्या केली. धारदार वस्तूने तिघांनी आपल्या हाताची नस कापून आत्महत्या केली आहे. या घटनेची नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र, महिला आणि मुलीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर यामध्ये मुलगा वाचला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली सुसाईड नोट

कोरोनामुळे पतीच्या झालेल्या मृत्यूचा धक्का महिला पचवू शकली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने आपल्या नातेवाईकांची माफी मागितली. आधी गळफास घेण्याचा विचार मनात आला मग तिघांनीही धारदार वस्तूने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या केली. नातेवाईक आणि शेजारच्यांनी घराचे दार तोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


हेही वाचा – Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यात ५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, बाधितांचा आकडा १५ पार


 

First Published on: August 6, 2020 10:29 AM
Exit mobile version