व्हॉट्सॲपवर करोनाची अफवा पसरवणारे दोघे ताब्यात

व्हॉट्सॲपवर करोनाची अफवा पसरवणारे दोघे ताब्यात

व्हॉट्सॲपवर करोनाची अफवा पसरवणारे दोघे ताब्यात

येवला तालुक्यातील पाटोदा आणि ठाणगाव येथे करोनाचे रुग्ण आढळल्याची अफवा पसवरणारे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमनसह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदेश पसरताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची खबरदारी घेत पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतले.

नक्की काय घडले?

नागडे येथील ऋतिक लक्ष्मण काळे हा रायगड ग्रुपचा व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमीन आहे. त्याने करोना व्हायरसचे रुग्ण पाटोदा आणि ठाणगाव येथे आढळून आल्याचा खोटा मेसेच तयार करून तो रुपचंद भागवतने ग्रुपवर व्हायरल करून लोकांच्या मनात भीती निर्माण होईल, असे कृत्य केले. हा संदेश त्याचा मित्र निमगाव मड गावातील कलिम सलिम पठाण याने फॉरवर्ड केला होता. याबाबत येवला पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध भा. द.वी. कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे मोबाईल जप्त केले आहेत.

पाटोदा येथील काही हज यात्रेकरू १५ दिवसांपूर्वी हजवरून परत आल्यामुळे आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास झालेला असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी त्यांची तपासणी केली. परंतु तसे काही आढळून आले नाही. या केवळ अफवा आहेत. अफवा पसरवणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. – मुज्जमील चौधरी, पोलीस पाटील (पाटोदा)


हेही वाचा – Coronavirus: नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक कैद्याचे होणार स्क्रीनिंग


 

First Published on: March 17, 2020 10:15 PM
Exit mobile version