घरताज्या घडामोडीCoronavirus: नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक कैद्याचे होणार स्क्रीनिंग

Coronavirus: नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक कैद्याचे होणार स्क्रीनिंग

Subscribe

प्रत्येक कारागृहामध्ये सर्दी, तापासारखे आजार असलेल्या कैद्यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी वेगळा वॉर्ड ठेवण्यात यावा असा आदेश देण्यात आला आहे.

करोना विषाणू फोफावत असताना आता तुरुंगात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक कैद्याचे ‘स्क्रिनिंग’ करण्यात यावे. नव्याने भरती होणाऱ्या कैद्यांचे आवश्यकता असल्यास इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. आधीपासून तुरुंगात असलेल्या सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेल्या कारागृहातून कैद्यांना अन्य कारागृहात हलविण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. कोरोना प्रसाराविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने गृह विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक गृहमंत्र्यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.


हेही वाचा – केरळमध्ये ६५ लाख लोकांना करोनाची शक्यता; होऊ शकतात २ लाख २७ हजार मृत्यू; IMAचं पत्र!

- Advertisement -

करोना प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. नव्याने घडणाऱ्या गुन्ह्यातील कैदी कारागृहात दाखल होतात. अंमली पदार्थांच्या विक्रीसारख्या गुन्ह्यात काही वेळा विदेशी मूळ असलेले कैदीही नव्याने कारागृहात दाखल होतात. त्या माध्यमातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवीन दाखल होणाऱ्या प्रत्येक कैद्यांची प्राथमिक तपासणी करुन स्क्रीनिंग करण्यात यावे. आवश्यकता असल्यास त्यांना अन्य कैद्यांपासून विलग ठेवण्यात यावे. प्रत्येक कारागृहामध्ये सर्दी, तापासारखे आजार असलेल्या कैद्यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी वेगळा वॉर्ड ठेवण्यात यावा असे आदेश देण्यात आले.


हेही वाचा – मुंबई लोकल, बस बंद होणार नाही, पण अनावश्यक प्रवास टाळा – मुख्यमंत्री

मुंबई आणि महामुंबई हद्दीतील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी दाखल आहेत. त्यामुळे मुंबईत नव्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यातील कैद्यांना थेट तळोजा कारागृहातच भरती करावे. राज्यातील कारागृहांमधील कैद्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कैद्यांची अधिक संख्या असलेल्या कारागृहातून कैद्यांना इतर कारागृहात हलविण्यात यावे. कैद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना भेटण्याची सुविधा बंद करण्यात यावी, असे सांगून या कालावधीत सर्व गुन्ह्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -