छगन भुजबळांचा मुलगा आणि पुतण्याला कोर्टाचा दिलासा, २०१५ च्या फसवणूकीच्या आरोपातून दोषमुक्त

छगन भुजबळांचा मुलगा आणि पुतण्याला कोर्टाचा दिलासा, २०१५ च्या फसवणूकीच्या आरोपातून दोषमुक्त

पंकज आणि समीर भुजबळांना न्यायालयाचा मोठा दिलासा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने २०१५ मध्ये रायगड जिल्ह्यातील गृहनिर्माण प्रकल्पात फसवणूक केल्याच्या आरोपातून दोषमुक्त केलं आहे. बुकींग करुन देखील तीन वर्ष झाली तरी देखील सदनिका सुपूर्द करण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

चेंबूरच्या येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलिसांनी पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे​इतर दोन संचालक राजेश धारप आणि सत्यन केसरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. २०१५ मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भुजबळ बंधूंवर मुंबई सत्र न्यायालयाने गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामामध्ये फसवणूक झाल्याचा ठपका या दोघांवर ठेवला होता. दरम्यान, आज विशेष न्यायाधीश एच.एस. सातभाई यांनी भुजबळ बंधु, राजेश धारप आणि सत्यन केसरकर यांना फसवणूक, गुन्हेगारी षडयंत्र आणि गुन्हेगारी विश्वासाचा भंग केल्याच्या आरोपातून दोषमुक्त करण्याची परवानगी दिली.

दरम्यान, तक्रारीमध्ये २०१५ मध्ये भुजबळ बंधुसह दोघांच्या कंपनीने २,३४४ फ्लॅट विकण्याची योजना आखली होती आणि त्यांनी ४४ कोटी रुपये गोळा केले होते. मात्र हा प्रकल्प विकसितच केला नव्हता असं म्हटलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस. सातभाई यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३९ अंतर्गत चारही व्यक्तींना निर्दोष ठरवत आरोपींची मुक्तता केली आहे.

 

First Published on: September 9, 2021 11:43 AM
Exit mobile version