घरताज्या घडामोडीCorona Update: दक्षिण भारतात कोरोना बॉम्ब फुटला, कर्नाटकात 3 जणांचा मृत्यू; मुंबई-महाराष्ट्रात...

Corona Update: दक्षिण भारतात कोरोना बॉम्ब फुटला, कर्नाटकात 3 जणांचा मृत्यू; मुंबई-महाराष्ट्रात रुग्णसंख्या दीडशेपार

Subscribe

मुंबई – राज्यात सोमवारी कोरोनाचे 28 रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रीय रुग्णसंख्या दीडशेपार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यानंतर ठाणे आणि पुण्याचा क्रमांक लागतो. कर्नाटकात आज तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर केरळमध्ये एका दिवसात 115 रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात कोरोना पसरतोय
मुंबईमध्ये कोरोनाचे सध्या 77 रुग्ण सापडले आहेत. ठाण्यामध्ये 29, पुण्यात 23, रायगडमध्ये 17 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 10 रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 आढळून आला आहे. यातील निम्मे रुग्ण ठाण्यातील आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Covid-19 JN.1 Variant : मुंबईच्या वेशीवर कोरोनाची जोरदार धडक; ठाण्यात सर्वाधिक रुग्ण

देशात यंदा कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 रुग्णांमध्ये आढळून येत आहे. सोमवारी कर्नाटकात 24 रुग्ण आढळून आले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये तर कोरोनाचा स्फोटा झाला आहे. येथे 115 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

- Advertisement -

कर्नाटकातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, JN.1 व्हेरियंटचे 34 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 20 रुग्ण बंगळुरुतील तर चार म्हैसूरचे, तीन मांड्या येथील आणि प्रत्येकी एक-एक प्रकरण रामनगर, बंगळुरु ग्रामीण, कोडागू आणि चामराज नगर येथील आहे. नवीन व्हेरियंट JN.1 मुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरीयंट JN.1 रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 डिसेंबर रोजी JN.1 या व्हेरीयंटचे 9 रुग्ण आढळले. ठाणे जिल्ह्यात 5, पुणे 2, तर अकोला आणि सिंधुदुर्गात प्रत्येक एका रूग्णाची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दहा रूग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाचे रूग्ण वाढत असेल तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी, मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा फायदा होताना दिसत आहे.

JN.1 या व्हेरीयंटचा शिरकाव देशात झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झाले आहे. राज्यातल्या कोरोनाच्या आकडेवारीमध्ये गेल्या 10 दिवसांत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, अजित पवार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणाले सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -