Live Update: भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

Live Update: भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण
भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अमरावतीमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शनिवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. सविस्तर वाचा 
वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात पुढची दिशा ठरवणाऱ्यासाठी पोहरादेवीमध्ये बंजारा भक्तिपीठाची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. संजय राठोड यांनी कधी समोर यावं, याविषयी या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला बंजारा समाजातील धार्मिक नेते, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

पुण्यात पुन्हा ३.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

पुण्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) सकाळच्या वेळेस पुण्यात ३.३ तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने याबाबत माहिती दिली आहे. मागील महिन्यातही पुण्याच्या पुरंदरमध्ये भूकंपाचे हादरे बसले होते. पुरंदरमध्ये आलेल्या भूकंपामुळे पुण्यात जवळपास २ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. परंतु आज पुण्यात आलेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित आणि आर्थिकहानी झाली नाही आहे.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक बोलावली आहे. कोरोनाचे नियमांचे नागरिक पालन करत नाहीत. लोक मास्क वापरत नाही आहे संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्णय  घेण्याची शक्यता आहे. मी मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितले त्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. काही भागात लॉकडाऊन लावण्याची गरज आहे. कोरोनाबाधित संख्या वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
एनसीबीची मोठी कारवाई गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एनसीबीकडून धडक कारवाई केली जात आहे. त्यातच आज पुन्हा एकदा एनसीबीने मुंबईच्या विमानतळावर कारवाई केली असून मुंबईच्या विमानतळावरुन ३ किलोपेक्षा अधिक हेरॉईन जप्त करण्यात आले आहेत. या हेरॉईनची किंमत तब्बल ९ कोटी इतकी असून या हेरॉईनसह एका आफ्रिकन महिलेला अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह
VIDEO : राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर देशी बॉम्ब हल्ला पश्चिम बंगालचे राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर देशी बॉम्बनं हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वादावादी सुरु आहे. त्यातच आता पश्चिम बंगालचे राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर बॉम्ब हल्ला केला. या बॉम्ब हल्ल्यात राज्यमंत्री जाकिर हुसेन आणि त्यांचे समर्थक गंभीर जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालचे मंत्री जाकिर हुसेन आणि त्यांचे काही समर्थक बुधवारी (१७ फेब्रुवारी) रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब हल्ला केला. राज्यमंत्री जाकिर हुसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असुन प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सतीश शर्मा यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी कुटुंबियांचे जवळचे सहकारी कॅप्टन सतीश शर्मा यांचे निधन झालं आहे. ७३ वर्षीय कॅप्टन सतीश गोव्यात अखेरचा श्वास घेतला. गेला काळ ते कॅन्सरशी झुज देत होते यादरम्यान त्यांना इतर आजारांचीही बाद झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांनी तीन वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. राजीव गांधींचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून कॅप्टन सतीश शर्मा यांची ओळख होती. पी.व्ही नरसिंह राव सरकारच्या काळात त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाची धुरा सांभळली. अमेठी आणि रायबेरली मतदारसंघातून त्यांनी नेतृत्त्व केले. त्यांच्या निधनानंंतर काँग्रेस नेत्याच्या प्रमुख नेत्या प्रियंका गांधीसह काँग्रेस इतर नेते आणि सहकरी नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

परभणीत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान एकीकडे राज्यात थंडीचे दिवस सुरु आहेत. तर दुसरीकडे पाहता राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तसेच मुंबई, कोकण वगळता राज्यातील इतर भागात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर बुधवारी परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तवली होती. त्याप्रमाणे परभणीत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे शेतीतील ज्वारी, गहू, हरबरा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील दोन दिवस पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मुंबईकरांची होतेय ‘लोकल’ भूल मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी ठरावीक वेळेत सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दररोज 50 ते 100 इतक्याच नव्या रुग्णांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई लोकल सुरू झाल्याने मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत असल्याचे सांगत राज्य सरकारकडूनच नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दहावी-बारावीच्या परिक्षा तोंडावर असताना मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली जाईल का यावरून विद्यार्थी आणि पालकवर्गात संभ्रम, गोंधळाचे वातावरण आहे. महिनाभरात देशभरात केवळ एक टक्का नागरिकांनीच कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारची उपलब्ध आकडेवारी बरीच बोलकी असल्याची दिसते.
First Published on: February 18, 2021 8:14 PM
Exit mobile version