राऊतांच्या टीकेमुळेच मोदी आणि ठाकरेमधील संबंध बिघडताहेत, केसरकरांचा टोला

राऊतांच्या टीकेमुळेच मोदी आणि ठाकरेमधील संबंध बिघडताहेत, केसरकरांचा टोला

बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरक यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टोरदार टीका केली आहे. त्यांनी राऊतांच्या टीकेमुळेच मोदी आणि ठाकरेमधील संबंध बिघडताहेत, असा आरोप केला आहे.

राऊतांनी राजीनामा द्यावा –

राऊतांच्या बद्दलच्या भावना तीव्र आहेत. त्यांनी आमदारांना राऊत साहेबांनी एकच सांगीतले आहे, की तुम्ही जर आम्हाला डुक्कर म्हणत असाल, मेलेली मानस, प्रेत किंवा इतर कोणी आम्हाला घाण कींव पीकलेली पाने म्हणत असेल तर राऊत साहेबांनी ते आम्ही दिलेल्या मतादानावर राज्यसभेत निवडणून आले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आम्ही जे निवडून आलो ते भाजप सेना युतीचे आमदार म्हणून निवडून आलो आहे. तुम्ही काय सांगता राजीनामा द्या म्हणून तुम्ही एकटे शिवसेनेला मतदान मागीतले होते का तुम्ही भाजप सेना युतीला मतदान मागीतले होते. त्यावेळी बॅनर आणि इतर साहीत्यावर मोदी साहेबांचा फोटो होता. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. हे सगळे घेऊन आम्ही समोर गेलो.

आम्हाला गद्दार का म्हणताय –

हे सगळ घेऊन गेलो असताना तुम्ही ज्यावेळी युती तोडली तेव्हा भाजपचे लोक आले रस्त्यावर तुम्ही का रस्त्यावर येताय. तुम्ही आम्हाला गद्दार का म्हणताय तुम्हाला हा अधिकार कोणी दिली. आम्ही दीड वर्ष पक्ष प्रमुखांशी बोलतोय
मी लेखी पत्रक काढले आहे. ते कसेबोलतात याबद्दल नाही म्हटले तरी भाजप या आधी कीती राज्यांमध्ये होती आणि मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर भाजप किती राज्यात पोहोचली यांची तुम्ही विचार करा.

दोघांमधील संबंध बीघडवण्यासाठी हे  प्रवक्ते कारणीभूत –

असा मनुष्य ज्याची जगभरात चर्चा होते. जो उद्धव साहेबांना छोटा भाऊ मानतो आणि मग त्यांच्या दोघांमधील संबंध बीघडवण्यासाठी हे जे प्रवक्ते कारणीभूत होत असतील तर याचा कुठेतरी विचार झाला पाहीजे. बदनामी कोणी केली. जर बदनामी नारायण राणे यांनी केली असेल तर  राणे भाजपचे सदस्य होते का ते मंत्री होतेका तुम्ही अशी जहरी टीका करत राहणार राऊत साहेब आणि समोरून काहीच कोण बोलनार नाही अशी का अपेक्षा करता. तुम्ही ही टीका केली तर टीका करणारा मनुष्य त्यांनी बाहेरुन घेतला. ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधा महाराष्ट्रा कोणी बोलत नाही. राज कारणात अॅक्शनला रीअॅक्शन असते. जर रीअॅक्शन थांबवायची असेल तर अॅक्शन थाबवायला पाहीजे, असे आरोप दिपक केसरकर यांनी केले.

First Published on: June 28, 2022 1:22 PM
Exit mobile version