…म्हणून शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही : अजित पवार

…म्हणून शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही : अजित पवार

यंदा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच, पुन्हा एकदा सरकारकडे मदतीची मागणी केली. तसेच, “ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही, कारण पावसामुळे त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकाचे (सोयाबीन, कापूस) नुकसान झाले होते”, असे पवार यांनी म्हटले. (crop damage due to heavy rainfall Farmers could not celebrate Diwali this year says Ajit Pawar)

राज्यभरात सर्वांनी मोठ्या आंनदाने आणि उत्साहाने दिवाळी साजरी केली. मागील दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळी साजरी करता आली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नातेवाईकांसह कोणालाच भेटता आले नाही. मात्र, यंदा जोरदार दिवाळी साजरी करण्यात आली. परंतु, दिवाळी साजरी केली असली, तरी एका गोष्टीचे दु:ख आहे, ते म्हणजे राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. आजही अनेक शेतकरी चिंतेत आहेत, काही जण आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत मी दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

राज्यात परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे चारीबाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही, कारण पावसामुळे त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकाचे (सोयाबीन, कापूस) नुकसान झाले होते. त्यामुळे याबाबत मागणी करूनही अद्याप मदत पोहोचली नाही.


हेही वाचा – एअरबस प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार हे वर्षभरापूर्वीच ठरलेले; पण तरीही…- उदय सामंत

First Published on: October 28, 2022 4:32 PM
Exit mobile version