MBBSच्या शिक्षणासाठी नवी मुंबईतील ‘हे’ महाविद्यालय ठरले सर्वात महागडे, एका वर्षाची फी लाखोंच्या घरात

MBBSच्या शिक्षणासाठी नवी मुंबईतील ‘हे’ महाविद्यालय ठरले सर्वात महागडे, एका वर्षाची फी लाखोंच्या घरात

MBBSच्या शिक्षणासाठी नवी मुंबईतील 'हे' महाविद्यालय ठरले सर्वात महागडे, एका वर्षाची फी लाखोंच्या घरात

नवी मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला क्वचितच परवडणारा असतो. त्यामुळे बऱ्याचदा इच्छा असूनही अनेक हुशार विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेताना 10 वेळा विचार करतात. तर अनेक विद्यार्थी हे स्कॉलरशिप मिळवून हे शिक्षण घेत असल्याचे पाहायला मिळतात. पण आता नवी मुंबईतील एका महाविद्यालयाकडून MBBS च्या शिक्षणाकरिता वर्षाला तब्बल 30 लाख 50 रुपये आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे कॉलेज म्हणजे नवी मुंबईतील प्रसिद्ध असे डी. वाय. पाटील महाविद्यालय. डी. वाय. पाटील महाविद्यालयाने वैद्यकीय शिक्षणासाठी सर्वाधिक महागडे महाविद्यालय म्हणून मान मिळविला आहे. या महाविद्यालयामधून MBBS पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 01 कोटी 25 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षणासाठीच्या सर्वाधिक महागड्या विद्यालयांच्या यादीत डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा समावेश झाला आहे. (D Y Patil College in Navi Mumbai is the most expensive for MBBS education)

हेही वाचा – मुंबईतील कामा, जीटी, सायन, नायर, कूपर, केईएम रुग्णालयंच आजारी; ‘या’ सुविधांचा अभाव

नवी मुंबईतील नेरुळ येथे असलेल्या डी. वाय. पाटील या स्वायत्त महाविद्यालयाचा कॅम्पस हा मोठा आहे. या महाविद्यालयाची शिक्षण पद्धती पण अत्यंत उत्कृष्ट असल्याने विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तर फी मध्ये महाविद्यालय फी, हॉस्टेल, ट्युशन फी तसेच इतर गोष्टींचा देखील समावेश आहे. तर डी. वाय. पाटील महाविद्यालयाची दुसरी शाखा असलेल्या पुण्यात MBBSच्या शिक्षणासाठी वर्षाला 29 लाख 55 हजार रुपये आकारले जातात. तर पुण्यातील भारती विद्यापीठ हे देखील वैद्यकीय शिक्षणासाठी 26 लाख 80 हजार रुपयांची आकारणी करते.

डी. वाय. पाटील हे MBBSचे शिक्षण घेण्यासाठी भारतातील महागड्या महाविद्यालयांपैकी एक असले तरी तमिळनाडूमधील अनेक स्वायत्त विद्यापीठे ही एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वर्षाला 25 लाख रुपयांपेक्षा अधिकची आकारणी करतात. तर चेन्नईमधील श्री रामचंद्र मेडीकल महाविद्यालय हे वर्षाला 28 लाख 10 हजार रुपये फी आकारतात. काही महाविद्यालयांकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी लाखोंच्या घरात फीची आकारणी करण्यात येते. तर काही महाविद्यालयांमध्ये महागाईनुसार देखील फी च्या दरात चढउतार झालेला पाहायला मिळत असतो.

First Published on: August 16, 2023 2:40 PM
Exit mobile version