घरमुंबईमुंबईतील कामा, जीटी, सायन, नायर, कूपर, केईएम रुग्णालयंच आजारी; 'या' सुविधांचा अभाव

मुंबईतील कामा, जीटी, सायन, नायर, कूपर, केईएम रुग्णालयंच आजारी; ‘या’ सुविधांचा अभाव

Subscribe

मुंबईतील कामा, जीटी, सायन, नायर, कूपर, केईएम रुग्णालयांमध्येही दुरवस्था असल्याचं दिसून येत आहे. कुठे वॉर्डच कमी, तर कुठे सीटी स्कॅनची मशिनच नाही.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 12 तासांत 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या मृत्यूंचं तज्ज्ञांकडून विश्लेषण करून डेथ ऑडिटचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यातून सर्व माहिती उघड होईलच, परंतु सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुविधांची वानवा असल्यानं हे मृत्यू ओढावल्याचं सांगितलं जात आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर आता इतर सरकारी रुग्णालयांची पाहणी केली असता, ही रुग्णालयंही दुरावस्थेत असल्याचंच चित्र आहे.

मुंबईतील कामा, जीटी, सायन, नायर, कूपर, केईएम रुग्णालयांमध्येही दुरवस्था असल्याचं दिसून येत आहे. कुठे वॉर्डच कमी, तर कुठे सीटी स्कॅनची मशिनच नाही.( Kama GT Sion Nair Cooper KEM hospitals in Mumbai are also in bad condition )

- Advertisement -

कूपर रुग्णालय

या रुग्णालयाची सहा माळ्यांची मुख्य इमारत अत्यंत वाईट स्थितीत आहे. रुग्णालयाच्या इमारतीचं डागडुजीचं काम सुरू आहे. सर्वच रुग्ण याच इमारतीत उपचार घेत आहेत. कूपर रुग्णालयात हे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलं तरीही MRI आणि CTScan या महत्त्वाच्या चाचणीचे काम खासगी कंत्राटदाराकडे आहे.

KEM रुग्णालय

केईएम रुग्णालयातील जवळजवळ 6 वॉर्डांची दुरावस्था झालेली आहे. त्यातील 4 वॉर्डमधील रुग्णांना शिवडीतील टीबी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे मेडिसीन विभागाच्या रुग्णांना दररोज तिथे उपचारांसाठी जावं लागतं. केईएममधील सर्जरी वॉर्डमधील रुग्णांना ईएनटी आणि डोळ्यांच्या वॉर्डचा भाग घेऊन त्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तसंच, वॉर्डच्या दुरुस्तीसाठी आणखी सहा महिने लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सायन रुग्णालय

सायन रुग्णालयात तर अध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्याचा ताण हा डॉक्टरांवर येऊन रुग्ण तपासणीसाठी अधिक वेळ लागत आहे. रुग्णालयातील ट्रॅामा सेंटरमध्ये उपचार घेताना अधिक वेळ लागत आहे. तसंच, नवीन ओपीडी इमारतीत रुग्णांची खूप गर्दी असते, त्यामुळे केसपेपर काढण्यावरून रोज भांडणं होत आहेत.

( हेही वाचा: रस्त्यांच्या आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आलोय; राज ठाकरेंनी घातला थेट विषयला हात )

जेजे रुग्णालय

सर जेजे रुग्णालयात देखील अनेक समस्या आहेत. अध्यापकांकरता राहण्यासाठी असणारी धन्वंतरी इमारत मोडकळीस आलेली असून ती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. रक्ताच्या काही चाचण्या या रुग्णालयाबाहेरून कराव्या लागत आहेत. तसंच, रुग्णालयाच्या अखत्यारितील जी टी रुग्णालयात सीटी स्क‌ॅन मशीन बंद पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -