Danish Open 2022 : आर. माधवनचा मुलगा वेदांतची मोलाची कामगिरी; भारतासाठी जिंकलं रौप्य पदक

Danish Open 2022 : आर. माधवनचा मुलगा वेदांतची मोलाची कामगिरी; भारतासाठी जिंकलं रौप्य पदक

अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने डॅनिश ओपन या स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये साजन प्रकाश आणि वेदांत मवन यांनी अनुक्रमे सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या या युवकांनी ही जबरदस्त कामगिरी केली आहे. जलतरणपटू आणि 2 वेळचा ऑलिंपियन साजन प्रकाशने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1:59:27 अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं.

याआधी प्रकाशची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 1:56:38 वर आहे. तर अभिनेता आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन यानं 1500m फ्री स्टाइल स्विमिंग प्रकारात रौप्य पदक कमावले आहे. हे पदक पटकावण्यासाठी त्याने आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला आहे. त्याने 15:57:86 अशी वेळ नोंदवत ही कामगिरी केली आहे.

डॅनिश ओपन ही स्पर्धा 15 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान कोपनहॅगनमध्ये पार पडत आहे. वेंदात आणि साजनसह शक्ति बालकृष्ण, तनिष जॉर्ज यांसारख्या खेळाडूंचं टॅलेंट भारतीयांना पाहता येणार आहे.


हेही वाचा – प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वेची वाहतूक अखेर 15 तासांनी पुर्वपदावर

First Published on: April 16, 2022 5:45 PM
Exit mobile version