‘हवेत कोण आहे याची…’, देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘हवेत कोण आहे याची…’, देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्लाही दिला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद शहरातील ऑरिक सिटीमध्ये भरवण्यात आलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आले आहेत. त्यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर टीका केली. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही भाष्य केले. “सीमाप्रश्नी सरकार खूप गंभीर आहे. आम्ही हरीश साळवेंशी संपर्क साधला आहे ते आपली केस मांडतील अशी मला आशा आहे. त्यामुळे आपली केस मजबूत आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, “सामनामधील संजय राऊतांच्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यावर उत्तर देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला. ‘सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही”, अशी खोचक टीका फडणवीसांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावर केली.

शरद पवार काय म्हणाले होते?

“सत्ता हातात आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते. पण की सत्ता ज्यांच्या हातात आहे. त्यांची वेगवेगळी विधानं असतात. यांना तुरुंगात घालीन, त्यांचा जामीन रद्द करीन.. ही काही राजकीय नेत्यांची कामं नाहीत. पण, इतकी टोकाची भूमिका काही राजकीय नेत्यांनी घेतली”, असे शरद पवार यांनी म्हटले.


हेही वाचा – दिल्ली अपघात : माहिती असूनही अंजलीला गाडीखालून फरफटत नेले, चौकशीतून बाब समोर

First Published on: January 8, 2023 5:22 PM
Exit mobile version