BJP : पक्ष बळकट करणं आमचं काम, चार मतदारसंघाचा आढावा घेणार – देवेंद्र फडणवीस

BJP : पक्ष बळकट करणं आमचं काम, चार मतदारसंघाचा आढावा घेणार – देवेंद्र फडणवीस

संग्रहित छायाचित्र

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सावनेर दौऱ्यावर आहेत. मतदारसंघात जाऊन ते आढावा बैठक घेत आहेत. त्याचप्रमाणे शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्ह्यातील ६ मतदारसंघात जाऊन प्रत्येक तालुक्याची मी आढावा बैठक घेत आहे. कारण ज्या काही आपल्या शासकीय योजना आहेत. त्या शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्यांना गती मिळाली पाहिजे. या दृष्टीकोनातून हा आढावा सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या दौऱ्यात मी चार मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. त्यानंतर पुन्हा एक दिवस देऊन मी दोन मतदारसंघ कव्हर करणार आहे. सगळे तालुके आणि नगरपालिका मी कव्हर करणार आहे. जेणेकरून तेथील समस्या आपल्याला संपवता येतील आणि सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवता येतील. तसेच पक्ष बळकट करण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जलसंधरणात लोकांचा रस वाढत आहे. केंद्र सरकारने नुकताच यासंदर्भातील अवहाल जारी केला. त्या अहवालातून स्पष्ट झालं की, जलयुक्त शिवारमुळे २०१८-१९ सालात महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आला. त्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याची स्थिरता आपल्याकडे वाढली, असंही फडणवीस म्हणाले.

काही लोकं अशा प्रकारचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आमच्या आमदारांनी आमच्याशी संपर्क केला. आम्ही पोलिसांना सांगून ट्रॅप केलं. त्यावेळी खोटी नावं आणि पैशींची लालच दाखवून मंत्रीपद देतो असे प्रकार घडले. परंतु मंत्री बनायला पैसे लागत नाहीत. त्यामुळे त्यांनी तत्काळ पक्षाला सांगितलं आणि आम्ही पोलिसांनाही माहिती दिली. त्यानंतर आम्ही अशा लोकांना ट्रॅप केलं, असंही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : Mahaprabodhan Yatra Beed : सुषमा अंधारेंना चापट मारणाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी, अंधारे म्हणाल्या…


 

First Published on: May 19, 2023 12:47 PM
Exit mobile version