संगमनेरच्या बाधिताचा मृत्यू; अकोल्यात आणखी एकाची भर

संगमनेरच्या बाधिताचा मृत्यू; अकोल्यात आणखी एकाची भर

Death of Sangamner's victim; Add another one in Akola

गुरुवारी सकाळी संगमनेरमध्ये आढळलेल्या दोन कोरोनाबाधितांपैकी एकाचा दुपारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. जुळ्यांना जन्म देणाऱ्या बाधित मातेपाठोपाठ आजचा हा दुसरा मृत्यू आहे. तर दिवसभरात १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यात केळुगन येथे नवा नवा बाधित रुग्ण मिळाला. त्यामुळे अकोले तालुक्याची संख्या आठ झाली आहे. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या चारजणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. यात संगमनेर व नगरच्या प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर आतापर्यंत बऱ्या झालेल्या ६२ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
सकाळी आलेल्या ९ बाधितांत सायंकाळी आलेल्या अहवालाने नव्याने चार रुग्णाची भर पडली आहे. यात राशीन (कर्जत) येथील ५३ वर्षीय व्यक्ती बाधीत आढळली आहे. ही व्यक्ती पुण्यात नोकरीला असणाऱ्या पत्नीला भेटून गावी परत आला होता. तर घाटकोपरहून राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे आलेल्या १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली असून यापूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेची ती नातेवाईक आहे. निमगाव (राहता) येथील बाधीत महिलेचा २० वर्षीय नातवालादेखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. चौथा चाळीस वर्षीय बाधित रुग्ण मुंबईच्या सायन येथून अकोले तालुक्यातील केळुगण गण (ता. अकोले) येथे आलेला असून तो सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करत आहे.

आतापर्यंत ११७ रुग्ण; ११ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत ११७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ११व्यक्तीचा मृत्यू झाला असून यात सर्वाधिक संगमनेरच्या पाच मृत रुग्णांचा समावेश आहे. सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील आठ तर मुंबईतील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बाधित आढळलेल्यात महानगरपालिका क्षेत्रातील १८, अहमदनगर जिल्ह्यातील ६०, इतर राज्यातील ०२, इतर देशातील ०८ इतर जिल्ह्यातील २९ रुग्णाचा समावेश आहे.

२१ अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित

जिल्ह्यात आढळलेल्या ११७ रुग्णांपैकी सध्या नगरच्या जिल्हा रुग्णालयात ३८, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दोन, तर संगमनेरच्या कोविड सेंटरमध्ये एका रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात २२७७ स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यापैकी २०९७ स्त्राव निगेटिव्ह आले आहेत. २५ स्त्राव परत पाठवले गेलेत तर १५ स्रावांचा प्रयोग शाळेला निष्कर्ष काढता आला नाही. अद्यापही २१ अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.
First Published on: May 29, 2020 8:41 PM
Exit mobile version