राज्यातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू

राज्यातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू

राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा (tiger) मृत्यू (death) झाला आहे. या वाघाचे वय १७ वर्ष होते. इतक्या वयाचा हा राज्यातील एकमेव वाघ होता. वाघडोह (waghdoh) नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. चंद्रपूरमधील (chandrapur) सीनाळा जंगलात वास्तव्य असलेल्या या वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला.

तरूण वाघांनी हुसकावले

वृद्ध झाल्याने या वाघाचा शिकार करताना मर्यादा येत होत्या. ताडोबा व्याघ्र (Tadoba National Park) प्रकल्पात या वाघाने आपला सुरूवातीचा काळ घालवला. मात्र, वृद्ध झाल्याने येथील तरूण वाघांनी त्याला हुसकावून लावले. त्यानंतर त्याचे वास्तव्य ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात होते. सहज शिकार मिळावी म्हणून हा वाघ येथे गावाशेजारी राहून होता. दरम्यान, सिनाळामधील जंगलात २१ मे ला एका गुरख्याचा मृतदेह आढळला होता. त्या गुराख्याची शिकार याच वाघाने केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बिग डॅडी ऑफ ताडोबा

वाघडोह वाघ बिग डॅडी ऑफ ताडोबा म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या.  हा वाघ एकेकाळी ताडोबाची शान होता. त्याच्यापासून  40 बछड्यांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे. म्हातारा आणि अशक्त झाल्यामुळे तीन वर्षापूर्वी इतर वाघांनी त्याला ताडोबातून हुसकावून लावले होते. तेव्हापासून तो सिन्हाळाच्या जंगलात वास्तव्यास होता.

वाघडोह भागात दीर्घकाळ

वृद्धापकाळामुळे या वाघ (tiger) अतिशय दयनीय अवस्थेत राहत होता. त्याचा व्हिडीओ काही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. व्हिडीओतून या वाघाची जर्जर अवस्था बघून तो जास्त काळ जगेल याची शाश्वती नव्हती. त्यानंतर सोमवारी या वाघाचा जंगलात मृतदेह आढळला. त्याचे सर्व अवयव शाबूत होते. हा वाघ ताडोबातील वाघडोह भागात दीर्घकाळ राहिला. त्त्यायामुळे ला वाघडोह मेल हे नाव पडले. सर्वसाधारणपणे १२ ते १५ वर्षे वयादरम्यान वाघाचा नैसर्गिक मृत्यू होतो. मात्र,  या वाघाने ती मर्यादा ओलांडली होती.

 

First Published on: May 23, 2022 5:09 PM
Exit mobile version