मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंकसाठी डिसेंबर २०२३ चे लक्ष्य, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंकसाठी डिसेंबर २०२३ चे लक्ष्य, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई – जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक (Mumbai-Pune expressway missing link) प्रकल्प हा देशात पथदर्शी  प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. डिसेंबर २०२३ हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समिती कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धेंची नियुक्ती, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

एकनाथ शिंदे यांनी मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) महासंचालक राधेश्याम मोपलवार,  एमएसआरडीसीचे सह संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी ८ कि.मी. असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसींग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूसंपादन बेकायदेशीर, गोदरेज कंपनीचा दावा

या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदूषण कमी होणार असून इंधनाची तसेच वेळेची बचत होईल. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रवाशी वाहने यांच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. दरडी कोसळू नये यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ करण्यात आले आहे. काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर एक्झीट मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे कोटिंग असणार असून त्यावर आगप्रतिबंधक कोटींग करण्यात येणार आहे. अत्याधुनिक हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा असून त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन आग विझेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

यावेळी अधीक्षक अभियंतावसईकर यांनी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. कामाची गती राखून नियोजित वेळेआधी प्रकल्प पूर्ण करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

असा आहे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प

First Published on: November 10, 2022 6:54 PM
Exit mobile version