देवळा बनावट मुद्रांक प्रकरण : मुख्य सूत्रधार वाघ अखेर ताब्यात

देवळा बनावट मुद्रांक प्रकरण : मुख्य सूत्रधार वाघ अखेर ताब्यात

बनावट मुद्रांक बनवून खोटे दस्त तयार करून खरेदी करण्यात आलेल्या शेतजमीन प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला फरार आरोपी मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याला अखेर अटक करण्यात देवळा पोलिसांना यश आले असून मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आले.

१३ फेब्रुवारीला देवळा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यापासून मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ हा फरार होता. पोलिसांना चकमा देऊन जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र अटकपूर्व जामीन मिळत नसल्याने अखेर महिनाभरानंतर पोलिसांना शरण आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोटू वाघ हा गेल्या महिनाभरापासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आले होते परंतु महिना उलटूनही मुद्रांक विक्रेता गोटू वाघला गजाआड करण्यात देवळा पोलिसांना यश येत नव्हते आज अखेर त्याला अटक करण्यात यश आले आहे. याबाबत अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,उपनिरीक्षक संजय मातोंडकर, खंडेराव भवर आदी करत आहे.

First Published on: March 17, 2021 11:20 AM
Exit mobile version