विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार पालकांनी शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी : उपमुख्यमंत्री

विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार पालकांनी शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी : उपमुख्यमंत्री

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी (HSC Result 2022) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी अभिनंदन केले. तसेच, विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे. (deputy cm ajit pawar congratulates students of 12th exam passed students)

अजित पवार यांनी उतीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या निकालात (Result) पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. “बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीने कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा”, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा – यंदाही १२ वीच्या निकालात मुलीच अव्वल; ९५.३५ टक्के मुली उतीर्ण

यंदा ९४.२२ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत ही सुद्धा समाधानाची बाब असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.

हेही वाचा – १२ वीचा निकाल जाहीर, ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही कोकण विभाग अव्वल

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकिर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.


हेही वाचा – भिवंडीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना

First Published on: June 8, 2022 3:05 PM
Exit mobile version