कार्यकर्त्याचा आग्रह, अजितदादांनी चहाच्या टपरीचं उद्घाटन करत घेतला चहाचा आस्वाद

कार्यकर्त्याचा आग्रह, अजितदादांनी चहाच्या टपरीचं उद्घाटन करत घेतला चहाचा आस्वाद

अजितदादांनी चहाच्या टपरीचं उद्घाटन करत घेतला चहाचा आस्वाद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत सहज पोहचता येतं, याचा प्रत्यय काल रविवारी दिसून आला. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील तुषार खलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘आपला हक्क, आपला व्यवसाय’ या उपक्रमाखाली फिरत्या चहाविक्रीच्या दुकानाची सुरुवात केली. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत होते. यावेळी तुषार खलाटे यांनी अजित पवारांनी दुकानाचं उद्घाटन करावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तात्काळ अजित पवार त्या ठिकाणी पोहोचले आणि दुकानाचं उद्घाटन करत गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला.

अजित पवार रविवारी महाआरोग्य अभियानाच्या निमित्ताने बारामतीत जाणार होते. तेव्हा तुषार यांनी त्यांच्या छोट्याश्या व्यवसायाचं उद्घाटन अजित पवार यांनी करावं अशी इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता लगबगीने त्याच्या फिरत्या दुकानाजवळ पोहोचले, त्यांनी फीत कापून उद्घाटन केले आणि त्याने दिलेल्या गुळाच्या चहाचा आस्वादही घेतला.

यावेळी त्यांनी व्यवसाय आणि त्याच्याविषयीची देखील चौकशी केली. तथापि, अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची गरज लागत नाही, ते सर्वांनाच सहजतेने उपलब्ध होतात आणि कार्यकर्त्यांचे मनही राखतात, याचा प्रत्यय या घटनेने आज पुन्हा एकदा सर्वांना आला.

दरम्यान, आपल्या दुकानाचे उद्घाटन स्वत: अजित पवार यांनी केल्याचा आनंद तुषार खलाटे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. चांगला व्यवसाय करा अशा सदिच्छाही जाता जाता पवार यांनी त्यांना दिल्या.

 

First Published on: July 26, 2021 10:19 AM
Exit mobile version