Maharashtra Budget Session 2022 : माझे ते विधान राज्यपालांशी जोडू नका – उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra Budget Session 2022 : माझे ते विधान राज्यपालांशी जोडू नका – उपमुख्यमंत्री अजित पवार

महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून महनीय व्यक्तींचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. माझे ते वक्तव्य राज्यपालांशी जोडू नका, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रदर्शनाच्या प्रस्तावाच्या चर्चे दरम्यान विधान परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ पुण्यातील कार्यक्रमानंतर लावण्यात आले. त्यानंतर अजितदादांनी विधान परिषदेत खुलीसा केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. उपमुख्यंत्री अजित पवार यांनी देखील रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मनातील सल बोलून दाखवली होती.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी अभिभाषण मांडले. विधानसभेत यावेळी गदारोळ झाल्याने राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडून सभागृह सोडले होते. विधान परिषदेत आज अभिभाषण चर्चेसाठी ठेेवले. भाजपचे सदस्य अभिजात वंजारी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव मांडला. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. वंजारी यांनी राज्यपालांनी राज्याच्या कामकिरीचे कौतुक केले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी राज्यपालांच्या विधानांवर आक्षेप नोंदवला. उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना याबाबत तक्रार केल्याचे सांगितले.

काय म्हणाले अजितदादा? 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर हरकत घेत, मी कोणत्याही एका व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. काही महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींकडून असे विधान होत आहेत. पंतप्रधानांना याबाबत केवळ सूचीत केले. माझ्या विधानांचा राज्यापालांशी थेट संबंध जोडू नये, असे स्पष्टीकरण पवार यांनी केले. तर महत्वाच्या पदावरील व्यक्तींनी जबाबदारी आणि भान ठेवून बोलायला हवे. सगळ्याच राजकीय पक्षांनी दक्षता पाळायला हवे, असे मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडले.


हेही वाचा : मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करू नये, मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला


 

First Published on: March 7, 2022 2:43 PM
Exit mobile version