…पण तुम्ही गधादारी नक्कीच आहात, हिंदुत्व वादावरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

…पण तुम्ही गधादारी नक्कीच आहात, हिंदुत्व वादावरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल बेस्टच्या एनसीएमसी कार्डचं लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान, हे कुठले आले घंटादारी हिंदुत्ववादी?, घंटादारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. परंतु तुम्ही घंटाधारी आणि गदाधारी आहात की नाही माहीत नाही, पण रोज टीव्ही लावल्यानंतर कळले तुम्ही गधादारी (गाढव) नक्कीच आहात, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जीवनपट उलघडून दाखविणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले. त्या कार्यक्रमात फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. काही लोकांना हिंदुत्व असण्याची लाज वाटते. आता तर नवं हिंदुत्व आलंय. ते म्हणजे घंटाधारी आणि गदाधारी. तुम्ही घंटाधारी आणि गदाधारी हिंदुत्ववादी आहात की नाही, हे माहीत नाही, पण रोज टीव्ही लावल्यानंतर कळते की, तुम्ही गधादारी (गाढव) नक्कीच आहात, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

भाजपच्या वाटचालीत अमित शहा यांचे पर्व आहे, हे पुस्तक त्याचा आलेख आहे. या पुस्तकाने त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतला आहे. मोदी हे रत्नपारखी आहेत, त्यांनीच हा हिरा शोधून काढला. गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरातमधील क्राईम रेट कमी केला, असं फडणवीस म्हणाले.

गुजरातमध्ये १९ एन्काऊंटर झाले ते दाखवण्यात आले आणि अमित भाईंना जेलमध्ये टाकले. त्यांना गुजरातच्या बाहेर राहायला भाग पाडले. त्यावेळी दिल्लीत राहत असताना अमित शहा यांनी भारतभ्रमण केले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे संघटन कमकुवत झाले होते. तेथील तेव्हाच्या नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचे सोडून दिले होते. पण, अमित शहा हे तिकडे गेले तसेच त्यांनी सर्व पाहणी केली आणि सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या, असे फडणवीस यांनी सांगितलं.


हेही वाचा : मुंबईतील ३३७ अतिधोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांचा जीव टांगणीला


 

First Published on: April 26, 2022 10:25 PM
Exit mobile version