हुतात्मा स्मारक हे राजकीय वक्तव्य करण्याकरीता नाही, फडणवीसांची शिवसेनेच्या नेत्यावर टीका

हुतात्मा स्मारक हे राजकीय वक्तव्य करण्याकरीता नाही, फडणवीसांची शिवसेनेच्या नेत्यावर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आमचा महाराष्ट्र हा प्रगती पथावर अग्रसर रहावो आणि हा महाराष्ट्र तयार करण्याकरीता ज्यांनी आपलं हुतात्म्य दिलं, अशा सर्वांना अभिवादन करत असताना महाराष्ट्रातील शेवटचा व्यक्ती, दिनदलीत, गोर-गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या राज्याने न्याय द्यावा. तसेच त्यांच्या जीवनामध्ये प्रगती यावी, अशा प्रकारच्या शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी दिल्या. दरम्यान, हुतात्मा स्मारक हे राजकीय वक्तव्य करण्याकरीता नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर केली.

हुतात्मा स्मारक हे राजकीय वक्तव्य करण्याकरीता नाही

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात बेळगाव आलं पाहीजे, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हुतात्मा चौकाजवळ केली होती. तसेच त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, हुतात्मा स्मारक हे राजकीय वक्तव्य करण्याकरीता नाही. ते हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरिता आहे. महाराष्ट्र दिवस साजरा करण्याकरिता या ठिकाणी आम्ही सर्व येत असतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही

मला असं वाटतंय की, आज महाराष्ट्र दिवस आहे. काही लोकं या ठिकाणी येऊन राजकीय वक्तव्य करतात. हुतात्मा स्मारक हे राजकीय वक्तव्य करण्याकरीता नाही. ते हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरिता आहे. महाराष्ट्र दिवस साजरा करण्याकरिता या ठिकाणी आम्ही सर्व येत असतो. त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. मात्र, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अशाप्रकारे तयार झालेलं कलादालन हे दुर्लक्षित असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहीजे. असं माझं मत आहे, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : शिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे, संदीप देशपांडेंचा टोला


 

First Published on: May 1, 2022 10:46 AM
Exit mobile version