घरताज्या घडामोडीशिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे, संदीप देशपांडेंचा टोला

शिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे, संदीप देशपांडेंचा टोला

Subscribe

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर होत असलेल्या राज ठाकरेंच्या या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंची आजची सभा ही ऐतिहासिक ठरणार आहे. ज्याप्रमाणे गुढीपाडव्याची सभा झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला एक वेगळीच दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे आता त्यांचा पुढचा टप्पा संभाजीनगर आहे. परंतु शिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे आहे, असा सणसणीत टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

शिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे

संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना आक्रमक होण्यासाठी सांगितलं यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, मुळात आक्रमक म्हणजे काय हे मला समजलं नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक होऊन शिवीगाळ केली म्हणजे आक्रमकता आहे का?, आक्रमकता ही कृतीतून दिसावी लागते. यांचे फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत, असा टोला संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

- Advertisement -

या सभेतून राज ठाकरेंचा संदेश हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात जाणार आहे. आम्ही आमचे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत, असं देशपांडे म्हणाले.

महाराष्ट्राच आणि देशाचं भविष्य उज्वल राहील – बाळा नांदगावकर

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज ठाकरेंच्या सभेला आनंदाने या आणि आनंदाने जा, असा सल्ला नांदगावकर यांनी मनसैनिकांना दिला आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला राज ठाकरे संबोधित करतील आणि शुभेच्छा देतील. महाराष्ट्राच आणि देशाचं भविष्य उज्वल राहील, अशी राज ठाकरेंची भावना असेल. परंतु ते काय बोलणार त्यासाठी माझे कान आतुरले आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमसाठी दोन दिवस शिल्लक असताना होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.


हेही वाचा : भाजपची बी टीम एमआयएमने काँग्रेसबद्दल बोलू नये; अतुल लोंढेंनी जलील यांना ठणकावलं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -