‘जमलंच तर तुटून पडा भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर’, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर कवितेतून टीका

‘जमलंच तर तुटून पडा भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर’, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर कवितेतून टीका

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कवितेतून निशाणा साधला आहे. जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर, किती दिवस तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर अशा शब्दात फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात घोटाळे केले, फेस मास्क, पेंग्विनमध्ये, टॅब खरेदी, पीक विमा, सफाई कामगार घर, सर्वाधिक घोटाळे हे या सरकारच्या काळात केले. कोविडच्या मृत्यू संख्येतसुद्धा घोटाळे केले, वेश्यांना अनुदान कोर्टाने देण्यास सांगितले त्यामध्ये सुद्धा यांनी घोटाळे केले आहेत.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात भाजपवर तुटून पडा, विरोधकांवर तुटून पडा, मुख्यमंत्री आमच्यावर तुटून पडाल तर तुम्ही तुटाल आणि पडालसुद्धा, आमच्या अंगावर याल तर सोडणार नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. शेकडो लोकं आमच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला करता कारण तु्म्हाला पोलिसांचा पाठिंबा आहे. तसेच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कवितेतून आव्हानच दिले आहे.

तुटून पडण्याची खुमखुमी, चला तुम्हाला आव्हान देतो….

जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर
किती दिवस तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर

आला कोरोना, घर भरोना हीच तुमची नीती ठरली
यशवंत म्हणतो मी तर माझ्या मातोश्रींचीच झोळी भरली
कुणी घडीवर कुणी माडीवर, कोट्यवधींचाच वाढला वावर
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर!

कोरोनाच्या लाटेत करोडोचे भरले गल्ले
मरणार्‍यांचे टाहो मात्र तुमच्या कानी नाही पडले!
ताव मारत राहिला तुम्ही कोविड सेंटरच्या मलाईवर
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर

अडीच वर्षाच्या कारकिर्दीत मंत्रालयही पडले ओस
नातेवाईकांच्या हिताची काही जणांना भारी हौस
शेतकरी आणि कष्टकरी सोडला तुम्ही वार्‍यावर
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर

लोडशेडिंगने वाजले बारा,
वीजबिल वसुलीचा तुघलकी फेरा
उभं शिवार जळतंय पाण्यावाचून घोटभर
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर

संपामुळे तीन महिने, बंद पडली लालपरी,
हजारो कर्मचार्‍यांची वाळून गेली शिदोरी
तरीही फरक नाही पडला तुमच्या मंत्री परबांवर
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर

तुमच्या नाकर्तेणामुळे गेले ओबीसी आरक्षण
वर्षे झालं तरी तुमचं सुरू आहे फक्त सर्वेक्षण
वंचित ओबीसी बांधव उपेक्षित आहे राज्यभर
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर

दलित, आदिवासींच्या प्रश्नाकडे तुमचा कायम कानाडोळा
खावटी अनुदान योजनाही उडवून गेला तुमचा कावळा
जमलंच तर लक्ष द्या कुपोषितांच्या पोषणावर
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर


हेही वाचा : तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, हिंदू आणि हिंदुत्व नाही, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

First Published on: May 1, 2022 8:52 PM
Exit mobile version