राणेंची क्षमता पाहून केंद्रीय मंत्रिपद दिलं, भाजप-शिवसेनेच्या युतीवर फडणवीस म्हणाले…

राणेंची क्षमता पाहून केंद्रीय मंत्रिपद दिलं, भाजप-शिवसेनेच्या युतीवर फडणवीस म्हणाले…

राणेंची क्षमता पाहून केंद्रीय मंत्रिपद दिलं, भाजप-शिवसेनेच्या युतीवर फडणवीस म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ४ मंत्रिपदे देण्यात आली आहे. भाजप नेते नारायण राणे यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्यो मंत्रालयाचे खातं दिलं आहे. राणेना मंत्रिपद दिल्यामुळे भाजप-शिवसेनेची युतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांना त्यांची क्षमता पाहून मंत्रिपद दिलं असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात अशी प्रतिक्रिया भाजप- शिवसेनेच्या युतीवर दिली आहे. महाराष्ट्राच्या वाटेला ४ मंत्रिपद मिळाली असल्यामुळे फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी नाशिकमध्ये सुरु करण्यात आलेल्या सिटी बससेवेबाबत आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी म्हटलं की, अतिशय आनंद आहे की, अतिशय अत्याधुनिक प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टम नाशिकला देत आहोत. ही अजून डेव्हलप करायला लागणार आहे. महानगपालिकेने ५० बसेस केंद्र सरकारकडे मागितल्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु निओ मेट्रो आणि बस सिस्टम या दोन्ही सुरु झाल्यानंतर एका आधूनिक शहरात नाशिकचे रुपांतर होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी महटलं आहे

महाराष्ट्राला मंत्रिपदाचा फायदा होईल

महाराष्ट्राला चार लोकांना संधी मिळाली यामध्ये मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राला खाती देखील चांगली मिळाली आहेत. रावासाहेब दानवे यांनाही चांगले खाते मिळाले आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राला चांगली खातील मिळाली असल्यामुळे याचा चांगला फायदा राज्यालाच होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या सुपुत्रीला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं असल्यामुळे त्यांचेही अभिनंदन आहे. तब्बल ५० वर्षांनंतर नाशिकला मंत्रीपद मिळाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजप-शिवसेना युती

नारायण राणे यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे शिवसेना- भाजपच्या युतीला पुर्णविराम मिळालाय का असा प्रश्न फडणवीस यांना केला असता त्यांनी म्हटलं की, एकतर चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात चर्चा वेगवेगळ्या होत असतात. नारायण राणे यांना मंत्री बनवत असताना त्यांच्या क्षमतेचा विचार केला आहे. इतर कोणताही विचार केला नाही.

खडसेंची ईडी चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरु केली आहे. अशी चर्चा सुरु असून खडसेंनीही तसा आरोप केलाय यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, या संदर्भात ईडी बोलायचे आहे ते बोलेल मी ईडीचा प्रवक्ता नाही. भारतीय राजकारणात अशा प्रकारचे विनडिक्टिव काम करण्याची कोणतीही प्रथा नाही. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

प्रीतम मुंडे नाराज

केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद हुकले असल्यामुळे खासदा प्रीतम मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत फडणवीस यांना विचारले असता त्यांनी उत्तरात म्हटलं की, त्या नाराज आहेत असं कोणी सांगितले. कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका, भाजपमध्ये सर्वोच्च नेते निर्णय करत असतात निर्णय करताना योग्य वेळी सगळे निर्णय होतात त्यामुळे अकारण कुठलीही नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

First Published on: July 8, 2021 3:23 PM
Exit mobile version