मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता, सोमय्यांवरील कारवाईवर फडणवीसांचे वक्तव्य

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता, सोमय्यांवरील कारवाईवर फडणवीसांचे वक्तव्य

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील घराखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सोमय्यांना गणेश विसर्जनासाठी जाण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई केली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप करायला हवा होता असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. गृहमंत्र्यांनी कारवाई केली असेल तर मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. देशाच्या इतिहासात तक्रार देणाऱ्याला अडवण्याची घटना पहिल्यांदाच घडली असेल. मुश्रीफांना कोणीही ऑफर दिली नाही असे म्हणत मुश्रीफांचा दावा फडणवीस यांनी खोटा ठरवला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांविरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झाले असेल की, एखादा व्यक्ती म्हणतो की, मी भ्रष्टाचाराच्याविरुद्ध पोलीस तक्रार करायला जाणार आहे. आणि पोलीस त्यालाच अडवतात, त्यावर कारण सांगितले जाते की, तुम्ही ज्यांच्याविरोधात तक्रार करायला जात आहात त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था कुठेही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे एकूणच जे काही चाललंय ते भयानक आहे. भाजप थांबणार नाही. सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई ही सुरुच राहील असा इशारा फडणीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे.


हेही वाचा : सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात, सोमय्यांच्या आरोपावर शिवसेनेची प्रतिक्रिया


फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारवाई केली असल्याची पुर्वकल्पना नव्हती असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर फडणवीस यांनी टोला लगावला आहे. “असं असू शकते की मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, थेट गृहमंत्र्यांनी कारवाई केली असेल, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करुन ही कारवाई थांबवायला पाहिजे होती.” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

मुश्रीफांना कोणी ऑफर दिली?

राष्ट्रवादी नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्यला चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु मुश्रीफ यांना कोणतीही ऑफर देण्यात आली नव्हती असा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “कोणी ऑफर दिली मुश्रीफ साहेबांना? कुठेही ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. आमचे ऑफर लेटर असेच मैदानात पडलेले नाहीत कोणालाही द्यायला” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Kirit Somaiya VS Hasan Mushrif: खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील, सोमय्यांचा फक्त वापर, हसन मुश्रीफांचा पलटवार


 

First Published on: September 20, 2021 12:43 PM
Exit mobile version