वडार समाजाच्या पाठीशी उभे राहणार – देवेंद्र फडणवीस

वडार समाजाच्या पाठीशी उभे राहणार –  देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वडार समाजाच्या होतकरु तरुणांसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात केले आहे. सोलापूरमध्ये वडार मेळाव्यात ते बोलत होते. वडार समाजाला निधी देण्याची घोषणा करतानाच होतकरु तरुणांना व्यवसायासाठी निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे उदाहरण दिले आहे. नागराज मंजुळेसारख्या दिग्दर्शकांना स्टुडियोसाठी जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत फँड्री, सैराट यांसारख्या चित्रपटांचे नाव या ठिकाणी घेतले. तसेच वडार समाजाच्या पाठीशी उभे राहत त्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या सरकारचा प्रयत्न असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी देणार

सोलापूर येथे वडार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वडार कुटुंबियाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी रुपये देणार असल्याचीही घोषणा केली आहे. तसेच होतकरु तरुणांसाठी, समाज भूषणांसाठी ज्या ज्या आवश्यकता असतील त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे असे देखील मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले आहे. जसे पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय विठ्ठलाचा रथ पुढे जाऊ शकत नाही. तसेच महाराष्ट्राच्या विकासाचा रथ वडार समाजाशिवाय महाराष्ट्र पुढे कसा जाईल? असे सांगत मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाच्या आरश्रणाचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे जाहीर केले आहे.


वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले धुळेकरांचे आभार

वाचा – शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुधाराव – देवेंद्र फडणवीस


 

First Published on: December 17, 2018 5:55 PM
Exit mobile version