कितीही हल्ले करा आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणारच, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

कितीही हल्ले करा आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणारच, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

महाविकास आघाडीचा आणि मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भाजपने मुंबईत पोलखोर अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या रथाचे नुकसान करण्यात आलं आहे. रथाची तोडफोड करण्यात आली आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही हल्ले करा आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणारच अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. राज्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणारच असा इशारासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आमचा घाव राज्य सरकारच्या वर्मी लागला असल्याचा टोला फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी फडणीवसांना पोलखोल अभियानाच्या रथावर जो हल्ला झाला त्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. यावेळी फडणवीस म्हणाले की, मला एकाच गोष्टीचे समाधान आहे की, आमचा घाव वर्मी बसला. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतो आहे. भ्रष्टाचाऱ्यांना अस्वस्थता वाटत आहे. त्यामुळे आमच्या या यात्रेवर हल्ला करत आहे. त्यांना एकच सांगतो कितीही हल्ला केला तरी पोलखोल थांबणार नाही भ्रष्टाचार आम्ही काढणारच आहोत असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

राज ठाकरेंबाबत फडणवीसांचं मोठं विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पांघरलेली शाल नवीन का जुनी असा प्रश्न केला असता फडणवीसांनी सांगितले की, हे काळ ठरवणार आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकार सुरक्षा राज ठाकरेंना पुरवणार का? हे सांगण्याचा अधिकार माझा नाही आणि मी सांगण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातील सगळे निर्णय कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे त्या त्या राज्यातील लोकं ते पाहत असतात. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हिंदुत्व कोणाच्या रक्तामध्ये

महाराष्ट्रातील फार मोठे साहित्यिक आहेत त्यांनी १५ ते २० वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात लिहिले आहे की, हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे. आणि कोणाच्या रक्तामध्ये आहे त्यामुळे मला वाटत तुम्ही जरुर पुस्तक वाचावे त्याची माहिती मी देईल. कोणाला बोललो त्यांना कळालं आणि जनतेला समजलं असल्याचा टोला नाव न घेता फडणवीस यांनी लगावला आहे.


हेही वाचा : Polkhol abhiyan: पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक, शिवसेनेचा हात असल्याचा दरेकरांचा आरोप

First Published on: April 19, 2022 4:53 PM
Exit mobile version