धनंजय मुंडेंचे पवार कुटुंबासह ‘बर्थडे सेलिब्रेशन’

धनंजय मुंडेंचे पवार कुटुंबासह ‘बर्थडे सेलिब्रेशन’

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेनी वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बारामती गाठत पवार कुटुंबासह बर्थडे सेलिब्रेशन केले. ‘सुप्रिया ताईंनी केक आणला आणि पवार साहेबांनी केक भरवून शुभेच्छा दिल्या’ याचा आनंद धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंडेंचा यावर्षीचा वाढदिवस खास ठरला आहे.

धनंजय मुंडेंनी ट्विवट करत दिली माहिती

याबाबत धनंजय मुंडेंनी स्वत: सेलिब्रेशनची ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, ‘कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम आमच्या मागे भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई! असाच आशीर्वाद राहू द्या,’ अशा भावना मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. मुंडे यांनी पवार कुटुंबाशी झालेल्या भेटीचे दोन फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये शरद पवार हे धनंजय यांना केक भरवताना दिसत आहेत.

मुंडेंनी घेतले पवारांचे आशीर्वाद

काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात करत आपले घर गाठले. त्यानंतर ते काही दिवस घरातच क्वारंटाईन होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस परळी येथील घरीच अत्यंत साधेपणाने साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी आज, वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बारामती गाठून पवारांचे आशीर्वाद घेतले.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ८,६४१ नव्या रूग्णांची नोंद; २६६ जणांचा मृत्यू


 

First Published on: July 16, 2020 8:26 PM
Exit mobile version