डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्रासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही – धनंजय मुंडे

डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्रासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही – धनंजय मुंडे

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे

मंत्रालय इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे प्रास्ताविक लावण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी प्रशासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. असे असले तरी देखील राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे मागील वर्षभरापासुन हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. मुख्यमंत्र्यांकडे यासाठी वेळ नाही का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावण्याची मागणी

आज संविधान दिनानिमित्त विधान परिषदेत सभापती यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलतांना धनंजय मुंडे यांनी हा महत्वाचा विषय उपस्थित केला आहे. ज्या इमारतीतून राज्याचा कारभार पाहिला जातो त्या शासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे तैलचित्र लावल्यास त्यांचा उचित सन्मान होणार आहे. परंतु यासाठी मुख्यमंत्री वेळ देवू शकत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून आजच डॉ. बाबासाहेबांचे आणि संविधानाच्या प्रास्ताविकाचे तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावर महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती घेऊन कारवाई करतो असे देखील सांगितले आहे.


वाचा – जल्लोष करायला सांगता आणि मराठा आंदोलकांची धरपकडही करता; धनंजय मुंडेची टीका


सरकारने ठोस निर्णय घ्यावा

सरकारकडून आम्हाला ठोस निर्णय हवा आहे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करणार की नाही? ५० हजार आणि १ लाख रुपये हेक्टरी देणार की नाही? दुष्काळग्रस्त भागातील विदयार्थ्यांची फी माफ करणार की नाही? असे संतप्त सवाल सरकारला करतानाच आम्हाला दुष्काळावर राजकारण करायचे नाही परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करु नये. भले शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल परंतु सरकारने ठोस निर्णय घ्यावा. तरच सभागृह चालू देऊ असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावावर बोलताना सरकारला दिला आहे.


वाचा – सरकारने स्व.गोपीनाथ मुंडेंचा अपमान केला – धनंजय मुंडे


First Published on: November 26, 2018 4:38 PM
Exit mobile version