राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे केली तक्रार

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे केली तक्रार

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे केली तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. आपलं फेसबुक पेज हॅक झाले असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी स्वतःच ट्विट करत दिली आहे. याबाबतची तक्रार सायबर सेल आणि फेसबुककडे करण्यात आली आहे. राज्यात सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले असल्याच्या अनेक घटना आहेत परंतु आता राज्यातील मंत्र्याचेच फेसबुक अकाऊंट हॅक झाले असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असतात. आपले विचार आणि मत सोशल मीडियावर धनंजय मुंडे मांडत असतात.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. धनंजय मुंडे फेसबुक वापरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना अॅक्सेस मिळत नव्हता. धनंजय मुंडे यांचा अॅडमिन अॅक्सेस काढल्यामुळे त्यांना आपलं फेसबुक अकाऊंट वापरण्यास असमर्थता येत आहे. आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाले असल्याची बाब मुंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फेसबुक आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाले असल्याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, “माझे फेसबुक पेज अज्ञात व्यक्तीने हॅक केला असल्याचा संशय आहे. फेसबुक आणि महाराष्ट्र सायबर सेलकडे याबाबतची तक्रार केली आहे” आशा आशयाचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. फेसबुकचा अॅक्सेस आणि पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी फेसबुक इंडियाकडे मागणी केली आहे.


हेही वाचा : Bank Holidays In November: नोव्हेंबर महिन्यात बँकाना १७ दिवस सुट्टी, पहा पूर्ण यादी


 

First Published on: October 26, 2021 7:00 PM
Exit mobile version