धाराशिव नव्हे ‘उस्मानाबाद’ हेच नाव वापरा, उच्च न्यायालयाचा आदेश!

धाराशिव नव्हे ‘उस्मानाबाद’ हेच नाव वापरा, उच्च न्यायालयाचा आदेश!

उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या राज्याच्या प्रस्तावास आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि जागोजागी आता उस्मानाबादच्या जागी धाराशिवच्या पाट्या लागल्या. पण आता यावर उच्च न्यायालयाने एक मह्त्तावाचा आदेश दिलाय. उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे आदेश उच्च न्यायालयने दिले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. यासंदर्भात पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे. परंतु 10 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा, असे आदेश देण्यात आले आहेत. धाराशिव हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव शासकीय व इतर कामकाजासाठी वापरू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. महसूल व जिल्हा परिषद विभागाकडून उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव असे वापरले जात होते. त्याबाबत आजच्या सुनावणीत पुरावे व प्रशासकीय पत्रव्यवहार कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने सूचना केल्या. म्हणजे सध्या फक्त शहराचे नाव धाराशिव वापरता येणार आहे. जिल्हा व तालुक्याचे नाव उस्मानाबाद असणार आहे.

महसूल विभाग स्तरावर बदल होईपर्यंत उस्मानाबादचं नाव बदलणार नाही, अशी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे. केवळ उस्मानाबाद शहराचे नाव हे धाराशिव केलं आहे. त्यामुळे शहरासाठी धाराशिव हे नाव वापरता येणार आहे. याचिकाकर्ते याचे वकील ऍड प्रज्ञा सतीश तळेकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

First Published on: April 20, 2023 6:56 PM
Exit mobile version