राज ठाकरेंसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावणार, दिलीप वळसे-पाटलांची माहिती

राज ठाकरेंसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावणार, दिलीप वळसे-पाटलांची माहिती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मी राज्यातल्या सर्व विरोध पक्षातील नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. तसेच या बैठकीला राज ठाकरेंना सुद्धा बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

राज ठाकरेंसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावणार

२०१५ आणि २०१७ साली राज्य सरकारने काही जीआर काढलेले आहेत. या जीआरमध्ये लाऊडस्पीकरच्या परवानगीच्या संदर्भातील काही पद्धत आहे. ती पद्धत ठरवून दिलेली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना संबंधितांना देण्यात येणार आहे. परंतु यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी राज्यातल्या सर्व विरोध पक्षातील नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. काही संघटनांची देखील बैठक बोलावून त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहे. त्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

वळसे पाटील पुढं म्हणाले की, या बैठकीत राज ठाकरेंना सुद्धा बोलावण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बैठकीला बोलावण्यात येणार आहे. आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक प्रकारच्या संघटना आहेत. या संघटना आपापला वेगवेगळा अजेंडा घेऊन पुढे जात असतात, असं वळसे पाटील म्हणाले.

कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर

कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबतीत सरकार अतिशय गंभीरतेने घेत आहे. संघर्ष वाढवू नका, हीच माझी सर्वांना विनंती आहे. तसेच तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, अशा प्रकारची कृती जर कोणाकडून झाली, तर त्या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक आढावा बैठक घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी काल घेतली. या बैठकीतील संपूर्ण अहवाल त्यांनी दिला. उद्याच्या काही दिवसांमध्ये राज्यांमध्ये काही परिस्थिती उद्भवू शकते. त्यासंदर्भात उपाय योजना करण्याच्या दृष्टीकोनातून आणि अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून काय तयारी केली आहे. याचा सविस्तर आढावा त्यांनी मला दिलाय.

सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय ऐच्छिक

मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात कुणीही सूचना दिलेल्या नाहीयेत. त्या संदर्भात मंदिरात स्वऐच्छेने आणि सुरक्षेच्या दृष्टीने जर सीसीटीव्ही लावले असतील आणि इतर प्रार्थनास्थळांना कोणाला लावायचे असतील. तर त्याला सरकारचा विरोध नसेल. जो तो आपापल्या स्वऐच्छेनेप्रमाणे निर्णय घेऊ शकतो.


हेही वाचा : Ravi Shastri: मानसिक थकवा टाळण्यासाठी विराटनं ब्रेक घ्यावा, माजी प्रशिक्षकांचं मोठं वक्तव्य


 

First Published on: April 20, 2022 3:44 PM
Exit mobile version