दिनो मौर्या हा BMC चा सचिन वाझे, नितेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

दिनो मौर्या हा BMC चा सचिन वाझे, नितेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

दिनो मौर्या हा BMC चा सचिन वाझे, नितेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

आर्थक गैरव्यवहरात बॉलिवूड अभिनेता दिनो मौर्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी दिनो मौर्यावर निशाणा साधत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी दिनो मौर्या मुंबई महानगरपालिकेचा दुसरा सचिन वाझे असल्याचे म्हटलं आहे. संदेसरा बंधूंनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिनो मौर्या अडचणीत सापडला आहे. नितेश राणे यांनी विधीमंडळातही दिनो मौर्या हा सरकारचा जावई आहे का असा सवाल केला होता. तसेच दिनो मौर्यावर कारवाई झाली पाहिजे यामुळे बीएमसीमधील अनेक पेंग्वीन बाहेर पडतील असं वक्तव्य नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी दिनो मौऱ्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. दिनो मौर्या याने ४ ते ५ चित्रपट केले आहेत. परंतु सध्या तो मुंबई पालिकेतील आणि सरकारी कामे असतील तर लगेच करुन देतो असे आश्वासन देत फिरतो आहे. सरकारची कामं करुन देतो असं सांगणारा हा दिनो मौर्या कोण आहे? कोणाचा मित्र आहे? कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार यांच्यामुळेच झाला आहे यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.

दिनो मौर्या मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे आहे. मौर्याची सखोल चौकशी केल्यावर अनेक पेंग्वीन बाहेर पडतील. त्याबाबत भाजपकडे पुरावे देखील आहेत. असं ट्विट भाजप नेते नितेश राणे यांनी केलं आहे.

कर्ज बुडवल्याच्या आरोपात कारवाई

दिनो मौऱ्याचा कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात हस्तक्षेप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधू यांनी १४,५०० कोटी कर्ज बँकेकडून घेतलो हेत. हे कर्ज बुडवल्याचा आरोप करण्यात आला असून यामध्ये दिनो मौर्याचा संबंध असल्याचे ईडीला तपासात समोर आले आहे. ईडीने कारवाईदरम्यान दिनो मौर्याची १.४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मौर्यासह इरफान अहमद सिद्दीकी यांची २.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावाई आहेत.

First Published on: July 3, 2021 3:38 PM
Exit mobile version